Jit Arolkar Goa Dainik Gomantak
गोवा

Mandrem Carnival: आमदार आरोलकरांच्या प्रयत्नांना यश! मांद्रे येथे 'व्हिवा कार्निव्हल'चा धमाका; विदेशी पर्यटकांची तुफान गर्दी

Goa Carnival 2025: पर्यटकांना सामावून घेत कार्यक्रमांचा आस्वाद घेतल्याने स्थानिकांचे आभार मानले

Akshata Chhatre

मांद्रे: गोव्यात यंदाच्यावर्षी सुद्धा कार्निव्हलची धूम दरवर्षी प्रमाणेच होती. पर्वरीतील कामामुळे यंदा पर्वरीत कार्निव्हल होऊ शकले नाही मात्र पणजी,मडगाव, वास्को म्हापसा आणि मांद्रे येथे लोकांनी आणि पर्यटकांनी कार्निव्हलची मजा लुटली. मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यावेळी अत्यंत खुश होते, व्हिवा कार्निव्हल असं म्हणत त्यांनी जमलेल्या सर्व पर्यटक आणि स्थानिकांचे स्वागत केले तसेच पर्यटकांना सामावून घेत कार्यक्रमांचा आस्वाद घेतल्याने स्थानिकांचे आभार मानले.

"आपण गोव्यातील बेस्ट कार्निव्हल"

कार्निव्हलच्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मांद्रे येथील लोकांनी केलेल्या पर्यटकांच्या आदरातिथ्याचा उल्लेख केला. आरोलकर म्हणतात की आपण दरवर्षी कार्निव्हलला उत्तम आणि दर्जेदार बनवण्यात यशस्वी होत आहोत.

विदेशातून आलेल्या लोकांसाठी स्थानिकांनी बसण्यासाठी जाग उपलब्ध करून दिली आणि स्वतः मात्र उभं राहून कार्यक्रम पहिला याचा मला अभिमान आहे. किनारीभाग असल्याने मांद्रे येथे देशी तसेच मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक कार्निव्हलची मजा घेण्यासाठी उपस्थित होते. मांद्रे येथील कार्निव्हलला मिळालेला हा प्रतिसाद पाहून आपण गोव्यातील बेस्ट कार्निव्हल म्हणून सर्व वर्तमानपत्रात असू असं उत्साह आरोलकर यांनी दाखवला.

कार्निव्हलसाठी मोठा प्रतिसाद; स्थानिकांनी मानले आभार

मांद्रे येथे कार्निव्हलचा उत्सव दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आला होता. आमदार जीत आरोलकर नेहमीच कार्निव्हल यशस्वी आणि रंजक बनवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच यंदाच्यावर्षी सुद्धा आम्हाला या कार्निव्हलसाठी मोठा प्रतिसाद मिळाला अशी माहिती मांद्रे कार्निव्हलच्या अध्यक्षांनी दिली. स्थानिकांनी देखील कार्निव्हल आयोजित करण्यासाठी मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री तसेच आमदार जीत आरोलकर यांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; घराबाहेर आले...पोलिस घेऊन गेले...!

Naru In Goa: गोमंतकीयांसाठी धोक्याची घंटा! गोव्यात आढळला खतरनाक 'नारू'; खांडेपार, कुर्टी येथे सापडला जंतू

Tragic Death: काळीज पिळवटले! खेळता खेळता पडला विहिरीत, मृत्यूशी दिली झुंज; 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

Zenito Cardozo Case: शिरदोन गँगवॉर प्रकरण! जेनिटोला ‘सुप्रीम’ दिलासा; 3 वर्षांच्या शिक्षेला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती

Goa Crime: मालमतेच्या वादातून जबरी मारहाण, मृतदेह सापडला गंभीर अवस्थेत; 3 कामगारांना अटक, मुख्‍य सूत्रधार बेपत्ता

SCROLL FOR NEXT