Goa Carnival: मांद्रे कार्निव्हलसाठी आमदार आरोलकरांचे खास निमंत्रण; डीजे मस्ती ते सुखबीर लाईव्ह, मनोरंजनाची पर्वणी!

Mandrem Carnival News: अधिकाधिक स्थानिकांनी तसेच पर्यटकांनी उपस्थित रहावे असे निमंत्रण मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी दिलेय
Mandrem Goa Carnival 2025
Mandrem Goa Carnival 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

Mandrem Goa Carnival Schedule 2025

मांद्रे: सध्या राज्यात कार्निव्हलची धूम सुरु आहे. सोमवार (दि. ३ मार्च) आणि मंगळवार (दि. ४ मार्च) रोजी मांद्रे येथे कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्निव्हलच्या फेरीत अधिकाधिक स्थानिकांनी तसेच पर्यटकांनी उपस्थित रहावे असे निमंत्रण मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी दिलेय. सोमवारी मांद्रे येथे स्टेजवरील कार्यक्रम होणार आहेत तर मंगळवारी मांद्रे येथे संध्याकाळी ६:३० वाजता कार्निव्हलची फेरी भरेल.

कार्निव्हलच्या फेरीची स्थानिक तसेच पर्यटकांना मजा लुटता यावी म्हणून गेल्यावर्षीपासून ही फेरी आश्वे येथे हलवण्यात आली आहे. "यंदाच्या वर्षी देखील अधिकाधिक लोकांना या कार्निव्हलचा आनंद घेता यावा म्हणून आम्ही पुरेपूर प्रयत्न केले आहेत" असं आमदार जीत आरोलकर म्हणालेत.

Mandrem Goa Carnival 2025
Goa Carnival 2025: वास्कोत कार्निव्हलची धामधूम! उद्या भव्य चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन; शहरातील वाहतुकीत बदल

यंदाच्या वर्षी मांद्रे येथील कार्निव्हलमध्ये वेगवेगळे संगीतकार, गायक,डीजे यांचा समावेश केला गेलाय आणि म्हणून सर्वांनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटावा असे आव्हान जीत आरोलकर यांनी केले आहे.

मांद्रे येथील कार्निव्हल कसा असेल?

सोमवारी मांद्रे येथे कार्निव्हलची सुरूवात होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता कार्निव्हलची सुरवात होईल यानंतर डीजे मस्ती नावाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय, जो की संध्याकाळी ६:३० वाजता होणार आहे. रात्री ८ वाजता सुखबीर लाईव्ह असा एक कार्यक्रम होईल आणि सर्वात शेवटी रात्री १० वाजता डीजे हिमानी सिंग हिचा कार्यक्रम होईल.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ४ वाजता डीजे मस्ती या कार्यक्रमाने कार्निव्हलची सुरुवात होईल. याशिवाय ६:३० वाजता कार्निव्हलची फेरी सुरु होईल आणि स्टेजवर सुद्धा मनोरंजनपर कार्यक्रम असणार आहेत. मांद्रे येथे होणाऱ्या या दोन दिवसांच्या कार्यक्रमात अनेक आकर्षक बक्षिसांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com