
Vasco Carnival Float Parade Traffic Diversion February 3
वास्को: वास्को कार्निव्हल समितीतर्फे उद्या म्हणजेच सोमवारी (3 फेब्रुवारी) चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आल्याने शहर भागातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.
दरम्यान, चित्ररथ मिरवणुकीला सेंट अँड्यू चर्चसमोरुन आरंभ होऊन ती स्वातंत्र्यपथाने दामोदर मंदिर, जोशी चौक, बडोदाबँक मार्गाने पुढे जाईल. त्यासाठी वाहतुकीमध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहे. वास्कोबाहेरुन येणारी चारचाकी वाहने तानिया हॉटेलसमोरच्या मोकळ्या जागेत उभी करण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सेंट जोसेफ वाझ मार्ग, दत्तात्रय देशपांडे मार्ग, स्वातंत्र्य पथ,एफ.एल गोम्स च्या अंतर्गत रस्त्यांवर चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी पार्किंग सोय करण्यात आली आहे. दुपारी एक ते मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
कार्निव्हल आयोजकांनी गोव्यातील सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापनाला प्राधान्य दिले आहे, गोवा पोलीस आणि आपत्कालीन सेवांच्या सहकार्याने एक व्यापक योजना लागू केली आहे. कार्निव्हलदरम्यान राज्यात तसेच कार्निव्हलच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थापन काळजीपूर्वक केले जाईल, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.