Mandre Panch Sexual Harassment Case Dainik Gomantak
गोवा

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Goa Sessions Court Warrant: मांद्रेचे पंच रॉबर्ट फर्नांडिस यांच्याविरोधात महिलेचा लैंगिक छळ, मारहाण आणि गैरवर्तन केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: मांद्रेचे पंच रॉबर्ट फर्नांडिस यांच्याविरोधात महिलेचा लैंगिक छळ, मारहाण आणि गैरवर्तन केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. फर्नांडिस यांनी दाखल केलेला दोषमुक्तीचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिल्यानंतरही ते आरोप निश्चितीच्या सुनावणीसाठी अनुपस्थित राहिले.

त्यामुळे न्यायालयाने फर्नांडिस यांच्याविरोधात २० जुलै रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. उत्तर गोवा सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश आरतीकुमारी नाईक यांनी २६ जून रोजी दिलेल्या आदेशात रॉबर्ट फर्नांडिस यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम २५० अंतर्गत दाखल केलेला दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला होता.

तक्रारदार महिलेचा वैद्यकीय अहवाल, तिच्या पतीच्या जखमी झाल्याचा दाखला आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे पुरावे पाहता आरोपीविरोधात प्रथमदर्शनी भक्कम पुरावे उपलब्ध असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते.

न्यायालयाने २६ जून रोजीच्या आदेशात आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार खटला चालवण्याचे आणि आरोप निश्चित करण्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार २० जुलैला त्याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप वाचून दाखवले जाणार होते. मात्र, सुनावणीवेळी फर्नांडिस अनुपस्थित राहिले. त्याचे वकीलही उपस्थित नव्हते.

प्रकरणाची पार्श्वभूमी

२ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२.२० वाजता मांद्रे येथील सर्व्हे क्रमांक २२६/१ जवळ मांद्रे पंचायतीतर्फे जागेची प्रत्यक्ष पाहणी सुरू होती. त्यावेळी पंच रॉबर्ट फर्नांडिस यांनी तक्रारदार महिलेशी वाद घातला.

तक्रारीनुसार, आरोपीने अश्लील आणि अत्यंत अपमानास्पद शब्दांचा वापर करत महिलेला धक्काबुक्की केली, तिच्या अंगाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून लैंगिक छळ केला, तसेच तिच्या पोटात बुक्की मारून व पायावर लाथ मारून तिला दुखापत केली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या तिच्या पतीलाही मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी मांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT