पणजी: मांडवी नदीत नव्या सातव्या कसिनोला परवानगी कोणीही मागितलेली नाही. तसा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
सध्या मांडवी डेल्टीन रॉयल, डेल्टीन जॅक, कसिनो प्राईड, मॅजेस्टीक प्राईड व बिग डॅडी असे सहा कसिनो कार्यरत आहेत. माहिती हक्क कार्यकर्ते सुदीप ताह्मणकर यांनी सरकार आहे तो तरंगता कसिनो तसाच ठेऊन नव्या कसिनोला मांडवीत परवानगी देणार असल्याचा आरोप केला होता. त्याबाबत चौकशी केली असता तसा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
एखादी कसिनो ऑपरेटर कंपनी जहाज बदलण्यासाठी अर्ज करत असेल तर नियमानुसार त्यावर निर्णय घेण्यात येतो. याचा अर्थ जूने जहाज हटवून त्या जागी नवे जहाज आणायचे असते, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने २०१७ मध्ये मांडवीतील कसिनोंची संख्या वाढू न देण्याचा निर्णय घेतला आहे. २४ डिसेंबर २०२४ रोजी राज्य सरकारने कसिनोंच्या परवान्यांचे नूतनीकरण करताना ते मार्च २०२७ पर्यंत केले आहे. त्यानंतर मांडवीतील कसिनोंना आहे त्याच जागी नूतनीकरण मिळणार नाही त्याना नव्या जागी स्थलांतरित व्हावे लागेल असे सरकारने स्पष्ट केले आहे.
रेईश मागूश भागात गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे त्या भागात नवा कसिनो येणार अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यातूनच हा आरोप झाल्याचे दिसून येते. मध्यंतरी धारगळ परिसरात हे कसिनो हलवण्याचा प्रयत्न झाला होता. तेथे सरकार गेमिंग झोन करणार होते. मात्र स्थानिक पातळीवर त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर तो विचार नंतर स्थगित ठेवण्यात आला आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सरकार याबाबत कोणताही निर्णय घेणार नाही, असे समजते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.