ED Raid Casinos: पणजी, कळंगुट येथील 7 कॅसिनोंवर ईडीचे छापे, कर्नाटकातही 30 जागांवर कारवाई

ED Raids Goa Casinos: कॅसिनो उद्योगाला हादरवून सोडणारी कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पहाटे पणजी व कळंगुट येथील सात कॅसिनोंवर एकाच वेळी छापे टाकले.
ED Raid
ED RaidDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कॅसिनो उद्योगाला हादरवून सोडणारी कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पहाटे पणजी व कळंगुट येथील सात कॅसिनोंवर एकाच वेळी छापे टाकले. सात स्वतंत्र पथकांनी समन्वय साधून पहाटे ५ वाजल्यापासून सुरू केलेले हे छापासत्र दिवसभर सुरू होते. ही संपूर्ण कारवाई प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट अंतर्गत बंगळुरू येथील अंमलबजावणी संचालनालयाने केली आहे.

ही चौकशी आर्थिक अनियमितता आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणांवर केंद्रित आहे. ज्यातील प्रमुख पर्यटन व गेमिंग आकर्षण मानल्या जाणाऱ्या या कॅसिनोंची आता कसून चौकशी सुरू असून तपास चालू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तपास पूर्ण होईपर्यंत कोणतेही अनुमान काढू नये, अशी सूचना देखील ईडीने केली आहे.

कारवाईचा संबंध बहुराज्य पातळीवरील बेकायदेशीर ऑनलाइन व ऑफलाइन सट्टेबाजी तसेच मनी लॉन्डरिंगच्या नेटवर्कशी जोडला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई कर्नाटकातील काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र ऊर्फ पप्पी आणि राजस्थानातील कॅसिनो ऑपरेटर समुंदरसिंह राठोड यांच्याशी संबंधित प्रकरणाशी जोडली जात आहे. या कारवाईचा व्याप्ती केवळ गोव्यापुरता मर्यादित नाही. कर्नाटक अजून ३० हून अधिक ठिकाणी ईडीने चौकशी सुरू केली आहे.

राष्ट्रपतींची स्वाक्षरी

पैसे देऊन खेळण्यात येणाऱ्या ऑनलाइन गेमिंगवर प्रतिबंध घालणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी स्वाक्षरी केली. संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात याबाबतचे विधेयक मंजूर करण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे विधेयक मांडताना ऑनलाइन गेममुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात पैसे गमवावे लागत असल्याचे सांगितले होते.

ED Raid
काँग्रेस आमदाराच्या गोव्यातील कॅसिनोंवर ईडीचे छापे; पहाटे पाचपासून झाडाझडती सुरु

काळ्या पैशांची उलाढाल व सट्टेबाजीचे जाळे

कॅसिनो उद्योग हा राज्याच्या महसुलाचा एक प्रमुख स्त्रोत मानला जातो. मात्र, या उद्योगाच्या सावलीत मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशांची उलाढाल व सट्टेबाजीचे जाळे कार्यरत असल्याची शक्यता या कारवाईतून अधोरेखित झाली आहे. ईडीच्या या कारवाईमुळे राज्यातील कॅसिनो क्षेत्रावर चौकशी सुरू झाली असून भविष्यात या उद्योगाचे नियम व कायदेशीर चौकट कडक करण्याच्या दृष्टीने मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ED Raid
ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

कॅसिनो ऑपरेटर समुंदरसिंह राठोडवर लक्ष

या प्रकरणातील दुसरा महत्त्वाचा धागा राजस्थानातील कॅसिनो ऑपरेटर समुंदरसिंह राठोड याच्याकडे सापडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्याच्यावर हुबळी (कर्नाटक) येथे हवाला नेटवर्क चालविण्याचा आरोप आहे. त्याचे गोवा, श्रीलंका आणि दुबई येथे कॅसिनो व्यवसाय असल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांनुसार त्याचा गोव्यातील कॅसिनोवरही छापा पडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com