Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: मांडवी एक्स्प्रेसमधून उतरला अन् पोलिसांच्या हाती लागला, 3.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नेपाळच्या नागरिकाला अटक

Drug Case: मांडवी एक्स्प्रेसमधून थिवी रेल्वे स्थानकावर उतरलेल्या मूळ नेपाळच्या प्रवाशाकडून कोलवाळ पोलिसांनी ३.५ किलो ग्रॅम गांजा जप्त केला.

Sameer Amunekar

म्हापसा: मांडवी एक्स्प्रेसमधून थिवी रेल्वे स्थानकावर उतरलेल्या मूळ नेपाळच्या प्रवाशाकडून कोलवाळ पोलिसांनी ३.५ किलो ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची किंमत ३.५ लाख रुपये इतकी असून रोशन जप्रेल (२५, रा. कळंगुट) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित मुंबईहून गोव्यात परतत होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही कारवाई १६ रोजी थिवी रेल्वे स्थानकावर करण्यात आली. संशयित रोशन हा मूळचा नेपाळी असून, तो मुंबईला गेला होता.

मांडवी एक्सप्रेसमधून तो थिवी रेल्वे स्थानकावर उतरला असता, स्थानकाबाहेर तैनात कोलवाळ पोलिसांच्या विशेष पथकाने संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडे ३.५ किलो गांजा आढळला.

हा गांजा संशयित आपल्या राज्यातील ग्राहकांना पुरविणार होता. संशयिताला एनडीपीएस कायद्यान्वये अटक करण्यात आली. गेल्या २०२४ मध्ये देखील, याच संशयिताला साळगाव पोलिसांनी एनडीपीएस गुन्ह्याखाली अटक केली होती.

दरम्यान, थिवी रेल्वे स्थानकावरील कारवाईत, उपनिरीक्षक दत्तराज राणे, कॉन्स्टेबल सुदेश केरकर, निखिल नाईक, प्रवीण पाटील, संतोष नार्वेकर, सदाशिव परब, निकलेश गावकर व सर्वेश राऊत यांनी सहभाग घेतला. पुढील तपास निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवाळ पोलिस करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT