New Mandovi Bridge Dainik Gomantak
गोवा

New Mandovi Bridge: नवीन मांडवी पूल अद्याप बंदच; सोमवारपासून शाळा सुरू, पालकांना करावा लागणार वाहतूक कोंडीचा सामना

Mandovi Bridge: नवीन मांडवी पुलाचे दुरुस्ती काम अद्याप अपूर्ण असून, हा पूल अजूनही सर्वसामान्य वाहतुकीसाठी बंदच आहे.

Sameer Amunekar

पणजी: नवीन मांडवी पुलाचे दुरुस्ती काम अद्याप अपूर्ण असून, हा पूल अजूनही सर्वसामान्य वाहतुकीसाठी बंदच आहे. प्रशासनाने हा पूल दुरुस्तीच्या कामासाठी २७ मार्चपासून बंद केला होता आणि ५ एप्रिलपासून तो पुन्हा सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, काम वेळेत पूर्ण न झाल्याने पूल खुला करण्यात आलेला नाही.

नवीन मांडवी पुल बंद असल्यामुळे पणजी आणि पर्वरी परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागत आहे. या पुलावर दररोज हजारो वाहनांची ये-जा होते. सध्या तो बंद असल्याने पर्यायी मार्गांवर अत्याधिक ताण निर्माण झाला आहे. प्रवाशांना आपला नेहमीचा प्रवास अधिक वेळखाऊ आणि त्रासदायक बनला आहे.

विशेष म्हणजे, उद्यापासून शाळा सुरुवात होत असल्यामुळं पालकांची चिंता आणखी वाढली आहे. मुलांना वेळेत शाळेत पोहोचवण्यासाठी पालकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

दुरुस्तीचे काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. २७ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, ६ एप्रिल उजाडला तरी पूल अद्याप खुला करण्यात आलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT