Panjim News Dainik Gomantak
गोवा

Panjim News : मद्यधुंद अवस्थेत पोहण्याचा मोह अंगलट, पणजी जिमखान्याच्या मागे एकाचा बुडून मृत्यू

मद्यधुंद अवस्थेत असल्याने मृत्यु झाल्याचा संशय

Rajat Sawant

Panjim News : पणजी जिमखान्याच्या मागील जॉगींग ट्रकच्या परिसरात एका व्यक्तीचा बुडून मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.

108 ला संपर्क करुन वैद्यकीय मदत मागविण्यात आली. दरम्यान, व्यक्ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

जॉगींग ट्रकच्या परिसरात मित्रासोबत हा व्यक्ती मद्यप्राशन करत होता असे तेथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मद्यधुंद अवस्थेत पोहत असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत युवकाचे नाव मजीब (रा. मडगाव) (पूर्ण नाव समजू शकले नाही) असे आहे.

हा युवक आपल्या मित्राला भेटण्यासाठी पणजी जिमखान्याच्या मागील जॉगींग ट्रकच्या परिसरात आला होता. मित्रासोबत भेट झाल्यानंतर येथील मांडवी खाडीत पोहण्याचा मोह त्याला आवरता आला नाही.

मजीब हा पोहण्यास उतरला. मात्र, काही कालावधीनंतर पोहताना तो पाण्यात बुडू लागला. तो बुडत असल्याचे लक्षात येताच त्याच्या मित्राने पाण्यात उडी घेत मजीबला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यु झाला होता. पणजी पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

जॉगिंग ट्रॅक की तळीरामांचा अड्डा ?

पणजी जिमखान्याचा मागील परिसर हा तळीरामांचा अड्डा बनल्याचे चित्र वारंवार दिसून आले आहे. या ठिकाणी रात्री आणि दिवसाढवळ्या काही व्यक्ती मद्यप्राशन करत असतात. त्यामुळे असे प्रकार घडतात.

राज्यात उघड्यावर मद्य प्राशन करण्यास बंदी आहे मात्र, नियम फक्त कागदावरच असल्याचे दिसून येते. असे अपघाताचे प्रकार रोखण्यासाठी याठिकाणी जॉगिंग ट्रॅक परिसरात बॅरिकेटींग करावे व पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी यावेळी स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT