Durgadas Kamat: माधान्य आहार देणाऱ्या स्वयंसेवी गटांचे थकलेले पैसे कधी फेडणार?

दुर्गादास कामतांचा सरकारला सवाल
Durgadas Kamat | Goa Forward Party
Durgadas Kamat | Goa Forward PartyDainik Gomantak

Durgadas Kamat: शालेय विद्यार्थ्यांना माधान्य आहार पुरविणाऱ्या महिला स्वयंसेवी गटांचे थकीत असलेले 3.75 कोटी रूपये शिक्षणं खात्याने अजूनही फेडलेले नाहीत यावर गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी लक्ष वेधले असून सरकार हे पैसे फेडणार कधी असा सवाल केला आहे.

Durgadas Kamat | Goa Forward Party
Yuri Alemao: राज्य महामार्ग 8 प्रमुख जिल्हा रस्ता म्हणून अधिसूचित; आमदार आलेमाव यांनी मानले काब्राल यांचे आभार

माधान्य आहार म्हणजे विद्यार्थ्यांचे अन्न. हे अन्न देण्यासाठीही सरकारकडे पैसे नाहीत का असा सवाल करताना या सरकारकडे इव्हेंट आयोजित करण्यासाठी आणि चार्टर विमाने घेऊन देशभरात भ्रमंती करण्यासाठी मुबलक पैसा आहे पण, विद्यार्थ्यांना अन्न देण्यासाठी पैसे नाहीत असा आरोप केला.

कामत म्हणाले, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी विधानसभेत या बद्दल प्रश्र्न उपस्थित केला होता. या स्वयंसेवी गटांचे पैसे लवकर फेडायची मागणी केली होती. दुर्दैवाने अजून ते पैसे फेडले गेले नाहीत. याबद्दल गोवा फॉरवर्ड मुख्य सचिवांना पत्र लिहून त्यांच्याकडून खुलासा मागणार असल्याचे कामत यांनी सांगितले.

Durgadas Kamat | Goa Forward Party
Palolem Beach : गोव्यात प्रेमी प्रेमीयुगुलाचा मृत्यू, 'व्हॅलेंटाईन डे' दिवशीच घडलेल्या घटनेने खळबळ

सध्या शिक्षण खात्याचा कारभार म्हणजे बट्ट्याबोळ झालेला आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर पुस्तके मिळत नाहीत, त्यांना गणवेष दिले जात नाहीत. शिक्षण संचालकांना याबद्दल विचारले असता त्यांच्याकडे काही उत्तर नसते.

त्यांनी केलेल्या सूचना शिक्षण खाते सांभाळणारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ऐकून घेत नाहीत का असा सवाल करून शिक्षण खात्याचा कारभार जर सांभाळता येत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com