Live Wire  Dainik Gomantak
गोवा

Ponda: कामाच्या शोधात गोव्यात आला अन् जिवाला मुकला, विजेच्या धक्क्याने गेला बळी?

फोंड्यातील बेपर्वा मलनिस्सारण कामामुळे आणखीन एकाचे निधन झाले आहे.

Pramod Yadav

Ponda: फोंड्यातील बेपर्वा मलनिस्सारण कामामुळे आणखीन एकाचे निधन झाले आहे. मे महिन्यात एका कामगाराचे मलनिस्सारण प्रकल्पाच्या चेंबरमध्ये बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी आलमगीर जुल्लर रेहमान (19, सध्या रा. बांदोडा, मुळ रा. पश्‍चिम बंगाल) याचा विजेच्या धक्क्याने बळी गेल्याचा आरोप होत आहे. तो कामाच्या शोधासाठी नुकताच गोव्यात आला होता.

(Man dies after contact with live wire near Ponda sewerage unit)

मिळालेल्या माहितीनुसार, पालिका इमारतीच्या समोरील मुख्य रस्त्यावर मलनिस्सारण प्रकल्पाच्या चेंबरचे काम सुरू असतानाच त्या ठिकाणी आलमगीरला विजेचा धक्का बसला. त्याला तत्काळ फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. मात्र, हा विजेचा धक्का की अन्य याबाबतीत शवचिकित्सा अहवालात स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे मयताचा व्हिसेरा अधिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

कंत्राटदाराची निष्काळजी

मलनिस्सारणाच्या कपिलेश्‍वरी येथील चेंबरचे 12 मे रोजी काम सुरू असताना अचानक या चेंबरमध्ये पाणी शिरल्याने शुभम भोपळे (21, महाराष्ट्र) हा कामगार बुडून मरण पावला होता. कंत्राटदाराच्या बेपर्वाईमुळे हा मृत्यू झाल्याचा दावा करत पोलिस तक्रारही झाली होती. आताही कंत्राटदाराची चूक असल्याचा आरोप होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Market: '..तर पालिकेसमोर मासे विकू'! वास्कोतील विक्रेत्यांचा पवित्रा; अन्यत्र मासळी विक्री बंदी, सायबिणीच्या स्थापनेची मागणी

Goa coastal survey: गोवा मुक्तीनंतरचे सर्वात मोठे सर्वेक्षण! किनारी भागांत धास्ती; बेकायदा बांधकामांवर होणार कारवाई

GCA: अखेर विषय संपला! रोहन गावस देसाईच ‘जीसीए’चे प्रतिनिधी; BCCI निवडणुकीसाठी शिक्कामोर्तब

Arambol: वृक्षतोड नाही, झाडी कापली! वन खात्याचा हास्यास्पद दावा; हरमलमध्ये संतापाची लाट

Goa Crime: बनावट ग्राहक पाठवला, सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश; मास्टरमाईंडला बेळगाव येथून अटक

SCROLL FOR NEXT