Fraud in Goa  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 2 हजार लोकांची फसवणूक, 18 कोटींचा गंडा; PMO कडे तक्रार करणार ?

पोलिस आणि इकॉनॉमिक सेलही एफआयआर नोंदवण्याबाबत गांभीर्य दाखवत नाहीत; गुंतवणूकदारांचा आरोप

Akash Umesh Khandke

मडगाव: कामाक्षी फॉरेक्स नंतर आता आणखी एक घटना समोर आली आहे ज्यात सुमारे दोन हजार लोकांना गंडा घालण्यात आला आहे. गुंतवणुकीवर 30-52 टक्के मासिक परतावा देण्याचे आश्वासन देऊन जयकुमार गोहिल याने 2 हजार लोकांची एकूण 18 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिस आणि इकॉनॉमिक सेलही एफआयआर नोंदवण्याबाबत गांभीर्य दाखवत नसल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी PMO ला पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारी वकील अमेय प्रभुदेसाई यांनी मडगाव येथील घटनेची माहिती दिली. अ‍ॅड. प्रभुदेसाई यांनी पोलीस आणि इकॉनॉमिक सेलला फरार आरोपी गोहिलविरुद्ध एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास करण्याची विनंती केली आहे. "30 ते 52 टक्के व्याजासह पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन त्याने कमिशनच्या आधारे कर्मचाऱ्यांमार्फत पैसे गोळा केले. जवळपास 2000 गुंतवणूकदार आश्वासनांना बळी पडले आणि त्यांनी कष्टाने कमावलेले पैसे गुंतवले. सुरुवातीच्या काळात गोहिलने वचन दिल्याप्रमाणे पैसे परत केले," ते म्हणाले.

प्रभुदेसाई पुढे म्हणाले की, "गोहिल गुंतवणुकदारांना 52 टक्के रक्कम परत करण्याचे आश्वासन देऊन पुन्हा गुंतवणूक करण्यास सांगत असे. धक्कादायक म्हणजे त्याच्याकडे कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचीही फसवणूक झाली." या घटनेमुळे गुंतवणुकदार संतप्त झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जलस्रोतांच्‍या सुरक्षेसाठीही कोर्टानेच पुढाकार घ्यायचा?- संपादकीय

Rashid Khan: 'मी अफगाणिस्तानसाठीच खेळणार!', राशिद खाननं नाकारलं भारताचं नागरिकत्व; आयपीएलच्या रणधुमाळीत मोठा खुलासा

डिचोलीत 'मानकुराद'ची चव किंचित झाली 'गोड', दर आवाक्यात; मानकुराद 1000 ते 1200 तर हापूस 500 रुपये डझन

शिरगावात 'मॉक ड्रिल' यशस्वी; मात्र नियोजनात मोठी विसंगती, दीड हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग; जेवणाची व्यवस्था नसल्याने उपासमारीची वेळ

Jammu and Kashmir Bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! उधमपूरमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; 10 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT