Margao Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Margao Fraud: कंपनीचा डायरेक्टर असल्याचे सांगून पठ्ठ्याने केली तब्बल 16 लाखांची फसवणूक; सायबर पोलीस घेतायत शोध

संशयित आरोपीने बँक कर्मचाऱ्यांना आपली खोटी ओळख सांगितली.

दैनिक गोमन्तक

Margao Fraud Case: खोटी ओळख सांगून पैशांची अफरातफर करण्याच्या घटना राज्यात सर्रास घडत असतात. अशीच घटना मडगावमध्ये घडली आहे. या प्रकरणात तब्बल 16 लाखांची फसवणूक करण्यात आली असून याबाबत सायबर क्राईम पोलिसही सक्रिय झाले आहेत.

असे आहे पूर्ण प्रकरण...

सादर गुन्हा हा मडगावमधील पंजाब नॅशनल बँकेच्या पाजीफोंड शाखेत घडला आहे. पैशांचा घोटाळा करणाऱ्या संशयित आरोपीने बँक कर्मचाऱ्यांना आपली खोटी ओळख सांगितली. आपण एका कंपनीचे डायरेक्टर असल्याचे सांगून आपल्या कंपनीचे व्यावसायिक बँक खाते या शाखेत असल्याचे त्याने सांगितले.

त्यानंतर त्याने आपल्या खात्यातील पैसे दुसऱ्या खात्यामध्ये RTGS हस्तांतरण करायचे असल्याचे बँक कर्मचाऱ्यांना सांगून यासाठी त्यांना प्रवृत्त केले. माहितीनुसार, आरोपीने कम्प्युटर डेटाबेस (resources) चा वापर करून तब्बल 16,42,104 रुपयांची फसवणूक केली आहे.

हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर तेज नाईक यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. याबाबत सायबर क्राईम पोलीसही काम करत असून आरोपीबाबत अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंत्री सुदीन ढवळीकर म्हणतात, 'गोव्यात मराठी राजभाषा होणे कठीण'

Viral Video: ‘हॅप्पी अंडस पंडस...’! स्वातंत्र्य दिनाची तयारी करणाऱ्या चिमुकल्याचा मजेदार व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही हसून-हसून व्हाल लोटपोट

Cristiano Ronaldo In Goa: फुटबॉल चाहत्यांची स्वप्नपूर्ती! ख्रिस्तियानो रोनाल्डो गोव्यात खेळणार

Goa Today Live News: बनावट कागदपत्रे प्रकरणी फोंड्याचे नगरसेवक शिवानंद सावंत यांना पुन्हा अटक!

हमारी विरासत, आने वाली नस्लों को राह दिखाएंगी। मुख्यमंत्री प्रमोद सावंत मनोहर पर्रीकरांच्या मार्गावर?

SCROLL FOR NEXT