Panaji : पणजीतील रस्त्यावर रात्री 'नेकेड मॅन'चा वावर! फोटो सोशल मिडियावर व्हायरल

Naked Man On Panaji Streets : त्याचा नग्न अवस्थेतील फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
Naked Man On Panaji Streets
Naked Man On Panaji StreetsDainik Gomantak

Naked Man On Panaji Streets : गोव्यात दिवसाकाठी अनेक लोकांची ये-जा असते. देश-विदेशातील अनेकजण दररोज गोव्यात दाखल होत असतात. परिणामी अनेक चित्र-विचित्र घटनाही आपल्याला पाहायला मिळत असतात. सध्या गोव्यात रात्रीच्या दरम्यान 'नेकेड मॅन'चा वावर पाहायला मिळाला.

पणजीतील रस्त्यावर रात्रीच्या वेळी एक माणूस संपूर्ण नग्न अवस्थेत फिरताना दिसून आला.

Naked Man On Panaji Streets
Flights To Goa: पहिल्यांदाच सुरू होणार भोपाळ-गोवा थेट विमानसेवा, जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

गोव्यात रात्रीच्या वेळी फिरतोय 'नेकेड मॅन'....

माहितीनुसार, पणजीतील डॉन बॉस्को शाळेजवळ एक माणूस कपड्यांशिवाय फिरताना दिसला. तो अशा अवस्थेत का फिरत होता, तसेच तो नेमका कुठला आहे हे मात्र अजून कळू शकलेले नाही. मात्र त्याचे अशा अवस्थेत वावरणे अतिशय संतापजनक असून यामुळे इतक लोकांना रस्त्यावरून जाणे कठीण बनले होते.

गोव्यात अशा घटना सर्रास घडताना दिसत आहेत. भर रस्त्यात गाडी थांबवून नाच करणे, इथले नियम न पाळणे, पर्यटकांच्या गाडीची काच फोडणे इ. घटनांमुळे गोव्याची प्रतिमा मलीन होत चालली आहेत.

सादर इसम गोव्यात नग्न अवस्थेत फिरताना दिसल्याने अनेकांनी त्याला 'नेकेड मॅन' असे संबोधायला सुरुवात केली. तसेच त्याचा नग्न अवस्थेतील फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काही लोकांनी या गोष्टीची थट्टा केली तर काहींनी याबाबत संताप व्यक्त करत असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com