Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Laptop Theft : लॅपटॉप चोरीप्रकरणी म्हापशात एकास अटक

एका गॅरेजमध्ये पार्क केलेल्या कारमधील लॅपटॉप चोरीच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी संशयित निरंजन पाटील (करासवाडा) यास आज अटक करीत चोरीचा लॅपटॉप जप्त केला.

दैनिक गोमन्तक

म्हापसा : एका गॅरेजमध्ये पार्क केलेल्या कारमधील लॅपटॉप चोरीच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी संशयित निरंजन पाटील (करासवाडा) यास आज अटक करीत चोरीचा लॅपटॉप जप्त केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार केथ रुडॉल्फ डिसोझा (कामरखाजन) यांनी आपली कार दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये ठेवली होती व कारच्या मागच्या सिटवर 55 हजारांचा लॅपटॉप ठेवला होता. संशयितही या गॅरेजमध्ये आपली कार दुरुस्तीसाठी घेऊन आला होता. यावेळी त्याने फिर्यादीच्या कारमधील लॅपटॉप चोरून नेला.

फिर्यादीने घरी गेल्यानंतर आपला लॅपटॉप गायब असल्याचे आढळले असता त्यांनी आपल्या कार्यालयात व कर्मचाऱ्‍यांकडे चौकशी केली. मात्र, लॅपटॉप सापडला नाही. त्यानंतर काल आपण कार दुरुस्तीसाठी दिली होती याची आठवण झाली. त्यांनी गॅरेजमध्ये जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर त्यांनी लगेच म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली.

दुसरीकडे, कुजिरा-सांताक्रुझ परिसरातील बंद असलेल्या एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. जुने गोवे पोलिसांनी या प्रकरणी संशयित मनदीप कुमार (24, उत्तरप्रदेश) याला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे, मात्र चोरीस गेलेल्या ऐवज अजून मिळालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: ग्रील कापून घरात घुसले, दाम्पत्याला बांधून ठेवलं, 50 लाखांचा ऐवज केला लंपास; म्हापशात बुरखाधारी दरोडेखोरांची दहशत

Nobel Prize Physics 2025: भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर! क्वांटम मेकॅनिकल टनलिंगच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांचा गौरव

Horoscope: उद्याचा दिवस खास! 8 ऑक्टोबर रोजी शुभ धन योगामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार, गणेशाचा असेल विशेष आशीर्वाद

Goa Crime: बुरखाधारी टोळीचा हैदोस! ग्रील कापून घरात घुसले अन् दाम्पत्याला बांधलं, लाखोंची रोकड अन् दागिने घेऊन झाले पसार

Goa News: खाणकाम मोफत मिळालेले नाही... अमित पाटकरांचा पालेकरांना हल्लाबोल; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT