CM Pramod Sawant : 70 हजार रक्षक-लाईफ सेव्हिअर घडवणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा; हृदयरोग प्रतिबंधक मोहिमेसाठी मिळणार मणिपाल हॉस्पिटलची मदत
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant : राज्यात पाच नागरिकांमागे एकाला डायबिटीस आणि हृदयरोगाशी संबंधित आजार आहेत. मात्र, याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. परिणामी आता कमी वयातील लोकांनाही हृदयरोगाचा झटका येऊ लागला आहे. यासाठीच 70 हजार प्रशिक्षित रक्षक-लाईफ सेव्हिअर तयार करणार आहोत. त्याला मणिपाल  हॉस्पिटलकडून वैद्यकीय प्रशिक्षणाची मदत मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, पूर्वी वयाच्या साठीनंतर होणारा हृदयरोग आता तिशीतच उदभवू लागला आहे. वरून सक्षम दिसणारे लोक चालता-बोलता मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे वयाच्या तिशीनंतर सर्वांनी वैद्यकीय चाचणी करून घ्यावी. योग्य आहार आणि व्यायामाकडे लक्ष द्यावे. नागरिकांना तातडीचा प्रथमोपचार मिळावा यासाठी प्रशिक्षित 70 हजार रक्षक तयार करणार आहोत. याचा फायदा राज्यातील जनतेसह पर्यटकांनाही होईल. मणिपाल हॉस्पिटलने आंतरराष्ट्रीय हृदय दिनाचे औचित्य साधून बेसिक लाईफ सपोर्ट सेवांचे प्रशिक्षण देणाऱ्या ‘रक्षक-लाईफ सेव्हियर’ या मोहिमेचा प्रारंभ केला. कार्यक्रमाला सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, मणिपाल हॉस्पिटल्सचे संचालक सुरेंद्र प्रसाद,  विभागप्रमुख हरी प्रसाद, डॉ. शेखर साळकर, अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालक नितीन रायकर आदी हजर होते.

मोहिमेचे उद्दिष्ट

‘रक्षक-द सेव्हियर’चे उद्दिष्ट वैद्यकीय आपत्कालीन प्रसंगांच्या वाढत्या संख्येकडे लक्ष देणे तसेच गोव्यातील रहिवाशांना बेसिक लाईफ सपोर्ट म्हणजेच मूलभूत जीवन समर्थन क्रिया व सेवांबद्दल प्रशिक्षित करून आपत्कालीन व गरजेच्या परिस्थितीत उपाय करण्यासाठी सक्षम बनविणे हे आहे.

CM Pramod Sawant
PFI Goa Connection : बिल्डर, बड्या व्यावसायिकांचे ‘पीएफआय’शी संबंध उघड

 शेकडो लोकांचे प्राण वाचवणारा उपक्रम

 राज्याला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. अलीकडच्या काळात रस्ता अपघातांमध्ये वाढ होत आहे. दर महिन्याला सरासरी 200 अपघात होतात. अशावेळी तातडीची मदत मिळाली तर त्यांचा जीव वाचू शकतो. आपत्कालीन परिस्थितीत प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी लोकांना वैद्यकीयदृष्ट्या प्रशिक्षित करण्याची गरज आहे. लोकांचा जीव वाचवू शकणारा हा उपक्रम आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यांना दिले प्रशिक्षण 

पोलिस, वाहतूक विभाग, कदंब वाहतूक महामंडळ, गोवा मानव संसाधन विकास महामंडळ आणि गोवा अग्निशमन व आपत्कालीन सेवेतील 125 पुरुष आणि महिलांना हे प्रशिक्षण दिले. विविध सार्वजनिक क्षेत्रातील (केंद्र आणि राज्य सरकारी विभाग) आणि खासगी समुदायातील लोकांना मूलभूत जीवन समर्थन किंवा बीएलएस यासारख्या जीव वाचविण्याच्या सेवा व कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com