Maple Truck Accident Dainik Gomantak
गोवा

Malpe Accident: मालपेजवळ महामार्गावरती ट्रक उलटला, रस्ता वाहतुकीसाठी झाला बंद; वाहनांची कोंडी

Maple Truck Accident: सविस्तर माहितीनुसार जी ए ०३ - व्ही ८४८८ या क्रमांकाचा हा टिप्पर ट्रक पत्रादेवीहून पणजीच्या दिशेने खडी घेऊन जात असताना टिप्पर ट्रक उलटून हा अपघात झाला.

Sameer Panditrao

पेडणे: मालपे येथे पेट्रोल पंप समोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर संध्याकाळी खडी नेणारा टिप्पर ट्रक उलटून अपघात झाला. सुदैवाने यावेळी महामार्गावर कुठलेही दुसरे वाहन नसल्याने दुर्घटना टळली.

सविस्तर माहितीनुसार जी ए ०३ - व्ही ८४८८ या क्रमांकाचा हा टिप्पर ट्रक पत्रादेवीहून पणजीच्या दिशेने खडी घेऊन जात असताना टिप्पर ट्रक उलटून हा अपघात झाला. महामार्गावर अपघातग्रस्त ट्रक आडवा झाल्याने तसेच ट्रकमधील खडी सर्वत्र झाल्याने काही काळ वाहतुकीसाठी हा मार्ग बंद झाला.

यामुळे वाहतूक पोलिसांनी म्हापसा पणजीच्या दिशेने जाणारी सगळी वाहतूक सर्विस रोड वरून वळवली. नंतर क्रेनच्या साहाय्याने हा अपघातग्रस्त ट्रक काढण्यात आला, तर रस्त्यावर सगळीकडे झालेली खडी काढण्याचे काम सुरू होते.

शंकर पोळजी व संजय बर्डे या ठिकाणी उपस्थित होते. ते म्हणाले, महामार्गाचे कंत्राट घेतलेल्या एमव्हीआर कंपनीने मार्ग योग्य पद्धतीने केला नाही.त्यामुळे या उंच सकल मार्गावर पावसाचे पाणी साठून राहते, वेगात असलेल्या वाहनाचे टायर रस्त्यावर चांगल्या प्रकारे पकड घेऊ न शकल्याने अशा प्रकारे अपघात होतात.

हा ट्रक उलटला तेव्हा जवळपास दुसरे वाहन नव्हते हे सुदैव. अन्यथा आज या ठिकाणी मोठा अनर्थ घडू शकला असता एमव्हीआर कंपनीने गोव्यात केलेले महामार्ग हे अशाच प्रकारचे लोकांच्या जीवावर उदार होऊन केलेले आहेत. पत्रादेवीनंतर गोव्याची हद्द ओलांडल्यानंतर बांद्यापासून सिंधुदुर्गमध्ये महामार्गाचे काम योग्य झाले आहे, असेही पोळजी व बर्डे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ST Reservation Bill Passed: गोव्यातील एसटी समाजासाठी आनंदाची बातमी; राजकीय आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत मंजूर

ST Reservation Goa: 'काँग्रेसमुळे रखडले एसटी समाजाचे राजकीय आरक्षण'; सत्ताधारी - विरोधकांची सभागृहात खडाजंगी

Goa Assembly Live: माजी राज्यपाल स्व. सत्यपाल मलिक यांना विधानसभेत श्रद्धांजली

Raksha Bandhan 2025: लहान भावाला द्या अशा भेटवस्तू, जे पाहून त्याच्या चेहऱ्यावर येईल हसू; पाहा Gift Ideas

Satyapal Malik Death: गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन, ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT