Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कारची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Mumbai Goa Highway Kasal Accident: मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिच्या अपंग पतीसह चार महिन्याची मुलगी आणि साडेतीन वर्षांचा मुलगा सुदैवाने बचावला.
Mumbai Goa Highway Accident
Mumbai Goa Highway AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

कसाल : मुंबई-गोवा महामार्गावर सोमवारी (4 ऑगस्ट) दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. तर तिच्या अपंग पतीसह चार महिन्याची मुलगी आणि साडेतीन वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला. ही हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कसाल येथे घडली. या प्रकरणी इर्टिका कार चालक राहुल शर्मा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मृत्यू झालेल्या महिलेचे नाव शमिका शशांक पवार (वय २७) असे असून, जखमी पतीचे नाव शशांक प्रकाश पवार (वय ४०) असे आहे. त्यांच्यासोबत असलेली चार महिन्याची मुलगी पवित्रा आणि साडेतीन वर्षाचा मुलगा प्रभास या दोघांचा थरारक जीव वाचला.

अपघातानंतर तात्काळ घटनास्थळी ओरोस पोलीस, महामार्ग पोलीस तसेच कसाल ग्रामपंचायतीचे सरपंच राजन परब हे पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.

Mumbai Goa Highway Accident
Goa: गोव्याच्या विद्यार्थिनीचा आवाज घुमला राजस्थानात! 'वनिष्ठा'चे युवा संसदेत प्रतिनिधित्व; दहशतवादावर मांडले परखड विचार

अपघात कसा घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातून येणारी भरधाव इर्टिका कार मुंबईच्या दिशेने जात होती. याचवेळी, कणकवलीच्या दिशेने जाणारे पवार दाम्पत्य आणि त्यांची मुले मोटारसायकलवर होते. त्यांनी महामार्गावरील दुसऱ्या लेनकडे जाण्यासाठी वळण घेतले, यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या इर्टिका कारने दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत शमिका पवार या रस्त्यावर जोरात आपटल्या. त्यांना गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. तर पती शशांक पवार हे जखमी झाले, मात्र मुलांचा जीव चमत्काराने वाचला.

Mumbai Goa Highway Accident
Goa Badminton: पैंगीणकर बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी! निशांत, अर्जुन, श्रेया, जान्हवी यांच्यात विजेतेपदासाठी लढत

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींनी मदतकार्य केले. कार चालक राहुल शर्मा याला ओरोस पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com