Venzy Viegas Dainik Gomantak
गोवा

खलाशांची पेन्‍शन योजना कायमस्‍वरूपी करा - वेन्‍झी व्हिएगस

वेन्‍झी व्हिएगस यांचा खासगी ठराव: सरदेसाई, बोरकरांचे समर्थन

दैनिक गोमन्तक

पणजी: ज्‍येष्ठ गोमंतकीय दर्यावर्दी आणि त्‍यांच्‍या विधवा पत्‍नीसाठी गोवा कल्‍याण योजनेद्वारे मिळणारी पेन्‍शन कायमस्‍वरुपी लागू करावी, असा खासगी ठराव आमदार वेन्‍झी व्हिएगस यांनी मांडला. तसेच समाज कल्‍याण खाते आणि अनिवासी भारतीय विभाग यांच्‍यात योग्‍य तो समन्‍वय साधून याचबरोबर दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेशी सुसंगपणे ही योजना कायमस्‍वरुपी लागू करावी, अशी मागणी आमदार वेन्झी व्हिएगस यांनी या ठरावाद्वारे केली. त्यांच्या मागणीला सरदेसाई, बोरकरांनीही समर्थन दिले. (Make sailors' pension scheme permanent - Venzy Viegas )

या ठरावाच्‍या बाजूने बोलताना आमदार विजय सरदेसाई म्‍हणाले, दर्यावर्दींसाठी असलेली पेन्‍शन योजना नोव्‍हेंबर 2022 मध्ये संपणार आहे. या योजनेत अनियिमितता आहे. गेल्‍या दीड वर्षांपासून या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. गोमंतकीय दर्यावर्दींमुळे राज्‍याला विदेशी चलन प्राप्‍त होते. यातून महसूल मिळतो. यामुळे अर्थव्‍यवस्‍थेला चालना मिळते. तरीही ज्‍येष्ठ दर्यावर्दी आणि त्‍यांच्‍या विधवा पत्‍नीस मिळणारी ही योजना सुरळीत नाही. सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे, असे सरदेसाई म्‍हणाले.

आमदार विरेश बोरकर म्‍हणाले, ही योजना वारंवार बंद पडते. कधी पैसे मिळतात तर कधी मिळत नाहीत. यामुळे दर्यावर्दींवर अन्‍याय होत असून सरकारने त्‍यांना न्‍याय द्यावा. आमदार दिगंबर कामत म्‍हणाले, ही योजना सुरू झाली, तेव्‍हा ती कायमस्‍वरुपी असावी, अशी सर्वांची भावना होती. प्रत्‍यक्षात तसे घडले नाही. दरवर्षी ती नूतनीकरण केली जाते. दर्यावर्दी पेन्‍शन मिळत नाही. सरकारने संबंधित सर्व खात्‍यांचा योग्‍य तो मेळ घालून ही योजना कायमस्‍वरुपी करावी.

आमदार एल्‍टन डिकॉस्‍टा म्‍हणाले, माझे वडील एक दर्यावर्दी होते. दर्यावर्दी आपल्‍या कुटूंबापासून दूर राहून काम करतात. वर्षांतील सहा-आठ महिने समुद्रात असतात. जीवावर उदार होऊन ते काम करतात. ते आपल्‍या कुटूंबास पैसे पाठवातात. यातून सरकारला विदेशी चलन प्राप्‍त होते. तसेच महसूलही मिळतो. दर्यावर्दींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्‍यांना कायमस्‍वरुपी पेन्‍शन द्यावी, अशी सूचना त्‍यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

India GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था सुस्साट! दुसऱ्या तिमाहीत GDP वाढ 8.2 टक्क्यांनी मजबूत, आर्थिक विश्लेषकांचे चुकले अंदाज

सात राजवंशांनी राज्य केलं, पण संस्कृती टिकली! गोव्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मठांचं कार्य महत्त्वाचं; CM सावंतांचं प्रतिपादन

SCROLL FOR NEXT