गोवा पंचायत निवडणुक वेळापत्रक जाहीर; आजपासून आचारसंहिता लागू

गोवा निवडणुक आयोगाने केली घोषणा
Goa Panchayat Election
Goa Panchayat ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

गेले काही दिवस आरोप - प्रत्यारोपांनी गाजलेला मूद्दा म्हणजे गोवा पंचायत निवडणूक 2022 . या निवडणूकांचे वेळापत्रक आता जाहीर झाले असून निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामूळे स्थानिक नेते आणि राजकिय गट आता नियोजनासाठी आपला वेग वाढवणार आहेत. (Schedule of Goa Panchayat Election 2022 Announced; Code of Conduct Applicable From Today )

Goa Panchayat Election
टॅक्सीमालकांची दादागिरी बंद करणार; गुदिन्हो यांचा इशारा

आयोगाने 186 पंचायतीसाठी कार्यक्रम जाहीर केला असून 10 ऑगस्टला मतदान होणार आहे. त्यामुळे शनिवारपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. 10 तारखेला मतदान व 12 ऑगस्टला मतमोजणी घेण्यात येणार आहे. 18 ते 27 अर्ज स्वीकारले पंचायत निवडणुकीसाठी यापूर्वीच वर्गीकृत जाती-जमाती, इतर मागासवर्गीय वर्गाच्या आरक्षणाच्या मुद्याने बराच वेळ हा मुद्दा न्यायलायत प्रलंबित होता. मात्र आता हा मुद्दा निकालात निघाला असून 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मतमोजणीने या निवडणूकिचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Goa Panchayat Election
गोवा काँग्रेसधील धुसफूस संपेना; 5 आमदारांना चेन्नईला हलवले

राज्य निवडणूक आयोगाने या बाबत आज अधिकृत घोषणा केली आहे. त्यामूळे या निर्णयाने आगामी पंचायत निवडणुकीच्या अगोदर ग्राम पंचायत क्षेत्रांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. त्यामूळे आता नेत्यांना मतदान होईपर्यंत मतदारांना अमिष दाखवणाऱ्या घोषणा करता येणार नाहीत.

...आणि गोवा पंचायत निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळणार

राज्यात गाजत असलेल्या पंचायत निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळणार की नाही ? याबाबत अनेक प्रश्‍न असताना राज्य सरकारने सादर केलेला इतर मागासवर्गीयांचा (ओबीसी) डाटा ग्राह्य म्हणून राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींना या निवडणुकांमध्ये आरक्षण देण्याचे तत्वतः मान्य केले आहे.

त्या संबंधाची अधिसूचना उद्या निघू शकते. या ओबीसी आरक्षणासाठी 19 पोटजातींची अधिसूचना आज पंचायत संचालनालयांने काढली. पंचायत निवडणुकांची घोषणा 17 किंवा 18 जुलै रोजी होईल अशी माहिती निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com