Bull Attack in Majorda Dainik Gomantak
गोवा

Majorda Dhirio Case: धीरयो मृत्यूप्रकरणी 2 पोलिस गोत्यात, अमेरिकेतील दोघांविरुद्ध लुकआऊट नोटीस; संशयित अजून फरार

Majorda Dhirio Death: माजोर्डा येथील धीरयो प्रकरणातील दोन संशयित जे सध्या अमेरिकेत आहेत, त्यांच्यावर लुकआउट नोटीस जारी करण्यात येणार आहे. त्यासंबंधी सध्या प्रक्रिया सुरू झाली.

Sameer Panditrao

मडगाव: माजोर्डा येथील धीरयो प्रकरणातील दोन संशयित जे सध्या अमेरिकेत आहेत, त्यांच्यावर लुकआउट नोटीस जारी करण्यात येणार आहे. त्यासंबंधी सध्या प्रक्रिया सुरू झाली असून, त्यांच्या बँक खात्याची माहितीही पोलिस गोळा करीत आहेत.

दरम्यान, या धीरयोप्रकरणी कोलवा पोलिस ठाण्याचे दोन पोलिस गोत्यात आले आहेत. बीटची जबाबदारी असलेल्या या दोघांवर आता कारवाई अटळ असून, ते निलंबित होण्याची शक्यता आहे.

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टीकम सिंग वर्मा यांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले असून, त्या दोन पोलिसांसंबंधी अहवाल सादर करण्यास कोलवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांना बजावले आहे. या प्रकरणातील एक संशयित कुडतरीचे माजी पंचसदस्य रुई मिनेझिस हे सध्या फरार आहेत. त्‍यांचा सध्या पोलिस शोध घेत आहे. त्याच्या घरीही तपासणी केली असता, ते सापडू शकले नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हल्ल्यात राजेश निस्तानी हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले अन्य काहीजण या हल्ल्यात जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT