Major accident on Verna Highway; Bike rider seriously injured Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : वेर्णा महामार्गावर मोठा अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

दोन्ही वाहने वास्कोहून वेर्णाच्या दिशेने जात असताना भरधाव वेगात असलेल्या ब्रीझा कार (GA06E6161) चा ताबा सुटून अ‍ॅक्टिव्हावर (GA06Y9982) धडकली आणि दुचाकी रस्त्याच्या पलीकडे जाऊन आदळली.

दैनिक गोमन्तक

गोव्यातील अपघातांचे सत्र सुरूच आहे. वेर्णा महामार्गावरील ब्लूबेरी हॉलजवळ आज सकाळी ब्रीझा कार आणि अॅक्टिव्हा स्कूटर यांच्यात मोठा अपघात झाला.

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहने वास्कोहून वेर्णाच्या दिशेने जात असताना भरधाव वेगात असलेल्या ब्रीझा कार (GA06E6161) चा ताबा सुटून अ‍ॅक्टिव्हावर (GA06Y9982) धडकली आणि दुचाकी रस्त्याच्या पलीकडे जाऊन आदळली.

(Major accident on Verna Highway; Bike rider seriously injured)

या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पुढील तपास वेर्णा पोलीस करत आहेत.

दरम्यान, राज्यात यंदाच्या वर्षी सुरु असलेलं अपघातसत्र अजून संपताना दिसत नाही. प्रत्येक दिवशी किंवा एक दिवसाआड रस्ता अपघातात बळी जात आहे. गेल्या तीन महिन्यात (एप्रिल ते जून 2022) या काळात 802 अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातात 59 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये दुचाकीस्वारांची संख्या 41 म्हणजेच 70 टक्के इतकी आहे. त्यामुळे राज्यात प्रत्येक 3 दिवसामागे दोघांचा मृत्यू होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Shack Policy: शॅक धोरणाला मुदतवाढ देण्याविरोधातील याचिका फेटाळली; 'सरकारचा अंतिम निर्णयच नाही, याचिका अकाली' खंडपीठाचे निरीक्षण

Mangal Gochar 2026: व्यवसाय, नोकरी अन् बँक बॅलन्स..! मंगळाचे नक्षत्रांतर 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार अफाट धनलाभ

Goa Ganeshotsav: गोव्यात 77 हजार गणेशमूर्तींची नोंद; तब्बल 22,886 मूर्तींमध्ये 'POP', पर्यावरण खात्याच्या पोर्टलवरील आकडेवारी समोर

Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

SCROLL FOR NEXT