Goa Accident News  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News : कार अपघातात मावस भाऊ-बहीण ठार; मापा-पंचवाडी येथील घटना

अन्‍य पाचजण गंभीर जखमी

दैनिक गोमन्तक डिजिटल

मापा-पंचवाडी येथे मुख्य रस्त्यावर कारची झाडाला जोरदार धडक बसून झालेल्‍या अपघातात दोघे ठार तर पाचजण जखमी झाले. मयत मावस भाऊ-बहीण आहेत. सिद्धम महादेव नाईक (11, रा. शिरोडा) व रेशम राजेंद्र नाईक (18, रा. रिवण) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात सोमवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडला.

मिळालेल्‍या माहितीनुसार, या अपघातात कारच्या पुढच्या सीटवर बसलेला महादेव नाईक यांचा मुलगा सिद्धम नाईक तर मागच्या सीटवर बसलेली रेशम नाईक ही दोघे गंभीर जखमी झाली. लागलीच त्‍यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले. पण डॉक्‍टरांनी मृत घोषित केले.

इतर जखमींमध्ये‍ कारचालक महादेव नाईक (४८), पूर्वा महादेव नाईक (४७), सौम्या महादेव नाईक (७), राधिका राजेंद्र नाईक (५२) व रोहिणी नाईक (२२) यांचा समावेश आहे.

शिर्डीतून कालच परतले होते

दोनच दिवसांपूर्वी पाज-शिरोडा व रिवण येथील दोन्ही कुटुंबीय शिर्डी येथे श्री साईदर्शनाला गेले होते. काल रात्रीच ते शिरोडा येथे घरी परतले होते.

रात्री उशीर झाल्यामुळे सकाळी रिवण येथे मेहुणी व तिच्या मुलांना पोचवण्यासाठी तसेच एका लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी कारचालक महादेव नाईक हे कारने (जीए ०५ डी ८७१७) पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्यासमवेत निघाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT