kadamba employee protest Dainik Gomantak
गोवा

Kadamba Mazi Bus: माझी बस योजना हा 'कदंब'च्या खासगीकरणाचा डाव; बसचालक संघटनेचा आरोप

कदंब कर्मचाऱ्यांचा योजनेला विरोध; मागण्यांसाठी पणजीत धरणे

दैनिक गोमन्तक

KTCL Majhi Bus Scheme: कदंब महामंडळाद्वारे राज्यातील खाजगी बस घेऊन त्या चालविण्यासाठी ‘माझी बस’ योजना राबविण्यात येणार आहे. परंतु, ही योजना कदंब महामंडळ, कदंब कर्मचारी या दोघांसाठी धोक्याची असून, महामंडळाचे खाजगीकरण करण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप करत कदंब बसचालक संघटनेचे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी योजनेला विरोध दर्शविला.

आझाद मैदानावर आज धरणे आंदोलन झाले. यावेळी कर्मचाऱ्यांना त्‍यांनी संबोधन केले. संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर, प्रसन्न उटगी, राजू मंगेशकर व इतर कदंब कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

‘माझी बस’ योजनेअंतर्गत आणलेल्या खाजगी बसेस आंतरराज्य सेवांसाठीही वापरल्या जातील. त्यावेळी कदंबचा आंतरराज्य वाहतुकीवर असलेला वकुब कमी होईल; कदंबची ताकद कमी होईल. ज्याचे नुकसान महामंडळाला भोगावे लागेल.

जोपर्यंत ही योजना मागे घेतली जाणार नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचा इशारा ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिला.

...तर आम्ही संप करू

माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी कदंब कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला; परंतु 2016 पासूनची सुमारे 34 महिन्यांची थकबाकी देणे बाकी आहे. आम्हाला ती हफ्या-हफ्याने दिली तरी चालेल; परंतु ती सरकारने द्यावी.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी निवडणूकीपूर्वी सर्व प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र अजून आमच्या मागण्या मान्य केल्या नसून, त्‍या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही संप करण्यास कदंब कर्मचारी मागे पुढे पाहणार नसल्याचे फोन्सेको यांनी सांगितले.

कदंब कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

  1. सातव्या वेतन आयोगाची थकबाकी द्या

  2. बदली चालक व वाहकांना कायम करा

  3. पगाराच्या 12 टक्‍के पीएफ जमा व्‍हावा

  4. स्वच्छ शौचालये, आराम कक्ष हवेत

  5. उपहारगृह (कॅन्टीनची) सुविधा मिळावी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cameron Green: 25 कोटींचा 'किंग' शून्यावर आऊट! IPL लिलावात इतिहास रचणाऱ्या कॅमेरुन ग्रीनची दुसऱ्याच दिवशी फजिती; सोशल मीडियावर चर्चांना उधाण VIDEO

Goa Politics : ''डबल इंजिन'चे आश्वासन Fail!आता जनताच भाजपला धडा शिकवेल; माणिकराव ठाकरे-अमित पाटकरांचा घणाघात

Goa Crime: वाळपई हादरली! 41 वर्षीय महिलेचे अपहरण करुन जंगलात लैंगिक अत्याचार; अज्ञात नराधमांविरोधात गुन्हा दाखल

IPL 2026 Auction: गोव्याचे क्रिकेटपटू 'आयपीएल' लिलावात पसंतीविना; सुयश प्रभुदेसाई, अभिनव तेजराणा व आणि ललित यादव Unsold

Drishti Marine: समुद्रात बुडणाऱ्या चौघांना जीवरक्षकांकडून जीवदान, दृष्टी मरीनची कामगिरी; दोन बेपत्ता मुलांना काढले शोधून

SCROLL FOR NEXT