Mumbai-Goa Vande Bharat Express
Mumbai-Goa Vande Bharat Express Dainik Gomantak

Mumbai-Margao Vande Bharat: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला जोडणार आणखी 8 डबे

प्रवासी क्षमता 530 वरून 1030 होणार
Published on

Margao-Mumbai Vande Bharat Express: मध्य रेल्वे (CR) मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आणखी आठ डबे जोडण्याचा विचार करत आहे. ही सेवा 27 जून रोजी सुरू झाली आणि कमी काळात जवळपास 94 टक्क्यांच्या सरासरी प्रतिसादासह सर्वात लोकप्रिय ट्रेन्सपैकी एक म्हणून समोर आली आहे.

सध्या, मध्य रेल्वे मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी, मुंबई-मडगाव आणि नागपूर-बिलासपूर या चार वंदे भारत ट्रेन चालवतात. मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी मार्गावर 16 डब्यांच्या गाड्या धावतात, तर मुंबई-मडगाव आणि नागपूर-बिलासपूर या मार्गावरील गाड्यांना फक्त आठ डबे आहेत.

Mumbai-Goa Vande Bharat Express
Goa Unity Mall: गोव्यात युनिटी मॉलसाठी 100 कोटी रूपये देणार; केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांची माहिती

मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाशी संपर्क साधला आहे. सध्याची आठ डब्यांची ट्रेन बदलण्यासाठी 16 डब्यांच्या रेकची विनंती केली आहे.

प्रवाशांचा वाढता भार कमी करणे आणि प्रवाशांच्या एकूण आराम आणि सुविधांमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने हे केले जात आहे.

मध्य रेल्वेच्या मते, या ट्रेनने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. गाडीचा वेग, आधुनिक सुविधा आणि वक्तशीरपणा, कार्यक्षम सेवा, वेळ वाचवणारा अनुभव यामुळे या गाडीने प्रवाशांना आकर्षित केले आहे.

Mumbai-Goa Vande Bharat Express
Goa Police: राजस्थान येथील कुख्यात गुन्हेगाराला गोव्यात अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेच्या विनंतीला मान्यता देत आणखी डबे जोडल्यास या वंदे भारत गाडीच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होईल. हा विस्तार केवळ मोठ्या संख्येने प्रवाशांना सामावून घेणारा नाही, तर गर्दीची समस्या कमी करण्यात आणि सर्वांसाठी अधिक आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासही मदत करणारा ठरेल.

जर बोर्डाने विनंती मान्य केली तर, सध्याची आसन क्षमता 530 प्रवासी आहे ती वाढून 1030 पर्यंत होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com