Majhe Ghar Scheme Dainik Gomantak
गोवा

Majhe Ghar Scheme: 'माझे घर' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! तक्रारी निवारणासाठी विशेष हेल्पलाईन सुरू

Majhe Ghar Scheme Helpline: माझे घर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या तक्रारी, शंका आणि विविध प्रश्नांचे त्वरित निराकरण करण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने विशेष हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: माझे घर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या तक्रारी, शंका आणि विविध प्रश्नांचे त्वरित निराकरण करण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने विशेष हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. या उपक्रमामुळे योजनेशी संबंधित नागरिकांना आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून प्रशासनाशी संपर्क साधणे अधिक सुलभ होणार आहे.

जिल्हाधिकारी (उत्तर) कार्यालयामार्फत ८८०६९१७११९ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदवता येणार आहेत.

तसेच अर्ज प्रक्रियेबाबत, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्जाच्या स्थितीविषयी तसेच योजनेशी संबंधित इतर प्रश्नांबाबतही माहिती मिळू शकणार आहे.

माझे घर योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

लाभार्थ्यांच्या अडचणींवर वेळेत कार्यवाही करून त्यांना अधिक चांगली सेवा देणे, तसेच प्रशासनाची प्रतिसादक्षमता वाढविणे, हा या हेल्पलाईनचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.उत्तर गोवा जिल्ह्यातील माझे घर योजनेच्या लाभार्थ्यांनी किंवा अर्जदारांनी कोणतीही अडचण अथवा शंका असल्यास कार्यालयीन वेळेत या हेल्पलाईन क्रमांकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT