CM Pramod sawant sanad distribution margao Dainik Gomantak
गोवा

Majhe Ghar Scheme: निवडणुकीच्या तोंडावर 'माझे घर' योजनेला वेग, मुख्‍यमंत्र्यांच्‍या हस्‍ते मडगावात 1 हजार सनदांचे हाेणार वितरण

CM Pramod sawant sanad distribution margao: विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर राज्य सरकारने बहुचर्चित ‘माझे घर’ योजनेच्या अंमलबजावणीला गती दिली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर राज्य सरकारने बहुचर्चित ‘माझे घर’ योजनेच्या अंमलबजावणीला गती दिली आहे. येत्या दहा दिवसांत किमान तीन हजार लाभार्थ्यांना घरमालकी आणि भूरूपांतराच्या सनदा वितरित करण्याचे लक्ष्य निश्चित करण्‍यात आले आहे.

या मोहिमेला गुरुवारी मडगावात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते एका विशेष कार्यक्रमात सुमारे एक हजार लाभार्थ्यांना सनदांचे वितरण करून सुरवात करण्‍यात येत आहे. राज्यात अनेक वर्षांपासून हजारो कुटुंबे विविध कायदेशीर आणि तांत्रिक अडचणींमुळे आपल्या घरांची मालकी अधिकृतपणे सिद्ध करू शकत नव्हती.

काही घरे स्वतःच्या जमिनीवर अनियमितरीत्या बांधण्यात आली होती, तर काही घरे सरकारी किंवा कोमुनिदाद जमिनीवर उभारण्यात आली होती. शिवाय स्वतःच्या जमिनीवर घरासोबत व्यावसायिक वापरासाठी बांधलेल्या इमारती, तसेच १९७५ पूर्वी अस्तित्वात असूनही अधिकृत नोंदी नसलेली घरे अशा विविध प्रकारच्या प्रकरणांचा समावेश या समस्येत होता.

या पार्श्वभूमीवर सरकारने विविध कायद्यांमध्ये आवश्यक दुरुस्त्या करून अशा घरांना कायदेशीर मान्यता देण्याचा मार्ग मोकळा केला. या सर्व उपक्रमांना एकत्रितपणे ‘माझे घर’ असे नाव देण्यात आले असून, नागरिकांना घरमालकीचा अधिकार आणि आवश्यक भूरूपांतर मंजुरी मिळवून देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या योजनेच्या प्रारंभिक टप्प्यात राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये जाऊन जनजागृती मोहीम राबवली होती. अनेक नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर प्रशासकीय प्रक्रियेमुळे योजना अपेक्षित गतीने पुढे सरकत नसल्याची भावना काही ठिकाणी व्यक्त होत होती. त्यामुळे लाभार्थ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

आता विधानसभा निवडणुकीची चाहूल लागत असताना सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीवर विशेष भर दिला आहे. मुख्यमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले जात असून, प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत राज्यभरातील विविध भागांत सनदा वितरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राजकीय वर्तुळात चर्चा : या योजनेच्या माध्यमातून हजारो कुटुंबांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घरमालकीच्या प्रश्नावर तोडगा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, निवडणुका जवळ येताच या योजनेला अचानक मिळालेल्या गतीमुळे राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाल्या आहेत. सरकार मात्र ही योजना सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठीच राबविण्यात येत असल्याचा दावा करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Language: गोव्यातूनच कोकणी हद्दपार होण्याच्या मार्गावर? CM सावंतांनी व्यक्त केली खंत: म्हणाले, "60 टक्के घरांतून कोकणी गायब...!"

Goa Eco-Friendly Ganesha: मूर्तीकारांसाठी सावंत सरकारची मोठी घोषणा! आता प्रत्येक मातीच्या मूर्तीवर मिळणार 'इतके' अनुदान; पर्यावरण संरक्षणाचा नवा पॅटर्न

Goa Shack Policy 2026: गोव्यात सुधारित 'शॅक धोरण' लागू! समुद्रकिनाऱ्यावर डेक-बेड्स, छत्र्या ठेवण्यासाठी पर्यटन खात्याने मागवले अर्ज

KTCL Recruitment Row: कदंब महामंडळाच्या मेगा भरतीला लागणार ब्रेक? कामगार आयुक्तांसमोरील 'ती' बैठक ठरली फोल; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

भारतानं पाकड्यांना पुन्हा तोंडावर पाडलं! वायुसेनेच्या डॉक्युमेंट्समुळे पाक लष्कराचा खोटारडेपणा जगासमोर; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT