Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : निसर्गाचा समतोल राखा, झाडे लावा : डॉ. चंद्रकांत शेट्ये

Tree Plantation : राष्ट्रीय हिंदू संघटन’तर्फे ३५० रोपांची लागवड

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली, झाडे ही आपले मित्र आहेत. पर्यावरणाचा समतोल राखतानाच, झाडे प्रत्येक प्राणिमात्राला प्राणवायू देतात. तेव्हा प्रत्येकाने वर्षातून किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे. ही काळाची गरज आहे, असे उद्‌गार डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी काढले.

डिचोलीत ‘राष्ट्रीय हिंदू संघटन’च्या वृक्षारोपण उपक्रमाच्या समारोप सोहळ्यात शेट्ये प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी संध्या खानोलकर, वीणा मराठे, सिंधू हेगडे, उज्‍ज्वला आचार्य, कांचन म्हापणकर, शुभलता कळंगुटकर, अश्विनी लामगावकर, अंजली जोशी, विद्या केळकर, भोलानाथ गाड, सिद्धेश्वर नाईक, हेगडे, नाईक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

‘एक पेड राष्ट्र के नाम’ या उपक्रमाद्वारे राष्ट्रीय हिंदू संघठनतर्फे डिचोलीतील नवीन चौपदरी बगलमार्गावर झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता.

वेगवेगळ्या संस्थांच्या सहकार्यातून हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. याद्वारे बगलमार्गावर जवळपास ३५० रोपांची लागवड करण्यात आली. त्‍यात औषधींसह विविध प्रकारच्या शोभेच्या झाडांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT