N. B. Rao Passed Away
N. B. Rao Passed AwayDainik Gomantak

N. B. Rao Passed Away: पहिल्या विधानसभेतील स्विकृत आमदार एन. बी. राव यांचे निधन

गुरूवारी पार्थिव दर्शनासाठी ठेवणार
Published on

N. B. Rao Passed Away: ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि गोव्याच्या पहिल्या विधानसभेतील स्विकृत आमदार तथा समाजसेवक नारायण बी. राव उर्फ एन. बी. राव यांचे 15 फेब्रुवारी रोजी दुपारी निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते.

N. B. Rao Passed Away
Goa PSI Recruitment scam: शाहांच्या खात्याने दिला दणका; 15 दिवसात अहवाल सादर करा, DGP ना आदेश

त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार 16 रोजी दुपारी 12 वाजता येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत करण्यात येतील. त्यांच्या पश्चात पुत्र, दोन स्नुषा, दोन विवाहित कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

एन. बी. राव हे नेहमी खादीचे सफेद कपडे वापरायचे. अडल्या नडलेल्यांची सरकारी कार्यालयातील कामे ते करुन द्यायचे. माजी केंद्रीय मंत्री स्व. जगजीवन राम यांचे ते निकटवर्तीय होते. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पार्थिव उद्या गुरुवारी सकाळी 9 वाजता दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com