Maina curtorim police arrested Accused Dainik Gomantak
गोवा

Nessai Crime News : जुगाराच्या वादातून युवकाचा खून; नेसाय येथील घटना

मानेवर केला वार; श्याम नाईक याला अटक

दैनिक गोमन्तक

Murder Case of jharkhand labour : गेल्या काही दिवसात राज्यात खुन्याच्या घटना वाढल्या आहेत. जुगार आणि दारूचे वाढते व्यसन हे गोव्यातील वाढत्या गुन्हेगारीचे मूळ असल्याचे उघड झालेले असताना काल रात्री नेसाय येथील एका बारमध्ये पत्त्याच्या जुगारातून झालेल्या वादात एकाने आपला दारूचा ग्लास फोडून झारखंड येथील कामगार राजीव महतो (वय 37) याच्या गळ्यात खुपसून त्याचा खून केला.

या प्रकरणात मायणा कुडतरी पोलिसांनी नेसाय येथील श्याम नाईक (वय ३५) याला अटक केली असून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. या हल्ल्यात राजी महतो यांच्या मानेवर आणि तोंडावर जखमा झाल्या असून त्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने इस्पितळात त्याचे निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री सात ते आठच्या दरम्यान ही घटना घडली. आरोपी आणि मृत व्यक्ती ज्या बारमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते, तेथे पत्त्यांचा जुगारही चालतो. ते दोघे दारूचा ग्लास भरून खेळण्यास बसले असताना अकस्मात त्यांच्यात वाद सुरू झाला. नंतर त्याचे भांडणात रूपांतर झाले.

रागाच्या भरात संशयिताने आपला दारूचा ग्लास टेबलावर आपटून फोडला आणि रागाच्या भरात राजीवच्या गळ्यात खुपसला. हा घाव इतका जबर होता की गळ्याच्या शिरेतून रक्तस्त्राव सुरू झाला. राजीव याला नंतर इस्पितळात हलविण्यात आले. मात्र, अति रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

संशयित हा स्थानिक असून तो वाहनचालक आहे, तर मृत राजीव हा नेसाय औद्योगिक वसाहतीत कामगार म्हणून काम करत होता व नेसाय येथे तो भाड्याच्या खोलीत आपल्या पत्नीसह रहात होता, अशी माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

SCROLL FOR NEXT