Maina Curtorim bike thief arrest Dainik Gomantak
गोवा

Bike Theft: सराईत चोरट्याच्या आवळल्या मुसक्या! 3 दुचाकी जप्त; मोठे रॅकेट असल्याचा संशय

Maina Curtorim bike thief arrest: संशयिताला यापूर्वीही पोलिसांनी पकडले होते. शनिवारी रात्री मायणा कुडतरी पोलिस पाद्रीभाट - नेसाय येथे गस्तीवर असताना त्यांना संशयित दुचाकीवरून जात असताना दिसला.

Sameer Panditrao

मडगाव: मायणा - कुडतरी पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळून तीन दुचाक्या जप्त केल्या. शहाबुद्दीन शेख (२८) असे संशयिताचे नाव असून तो पर्वतवाडा - केपे येथे राहत आहे. हल्ली दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून त्यात वरील संशयिताचा हात असावा असा पोलिसांना संशय आहे.

संशयिताला यापूर्वीही पोलिसांनी पकडले होते. शनिवारी रात्री मायणा कुडतरी पोलिस पाद्रीभाट - नेसाय येथे गस्तीवर असताना त्यांना संशयित दुचाकीवरून जात असताना दिसला. संशयावरून पोलिसांनी त्याला हटकले.

त्यावेळी तो पोलिसांना समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. मागाहून त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले असता, त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याचे उघड झाले. नंतर पोलिसांनी अन्य दोन दुचाक्या त्याच्याकडून जप्त केल्या.

त्यातील दोन दुचाक्या केपे परिसरातून, तर एक कामुर्ली येथून चोरीला गेली होती. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT