Goa Crime: मोफत शॉपिंग डिलचे आमिष अंगलट, निवृत्त बँक कर्मचाऱ्याला 3 लाखांचा गंडा; संशयिताला कलकत्त्यातून अटक

Goa Fraud: जुने गोवेचे पोलिस निरीक्षक यांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे अज्ञाताने तक्रारदाराला व्हॉट्स ॲपवर फोन केला. त्याने स्वतःची ओळख ‘बँक ऑफ बडोदा’चा कर्मचारी दीपक अग्रवाल अशी केली.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बँक ऑफ बडोदाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी क्रेडिट कार्डवर मोफत शॉपिंग डिल केल्याचे सांगून ३.१३ लाखांची फसवणूक करणाऱ्या पश्‍चिम बंगालमधील संशयित सुमन घुघू याला जुने गोवे पोलिसांनी कोलकाता येथे ताब्यात घेऊन ट्रान्झिट वॉरंटवर गोव्यात आणले आणि अटक केली. आपली फसवणूक झाल्याची तक्रार सांताक्रुझ येथील ७१ वर्षीय निवृत्त बँक कर्मचाऱ्याने जुने गोवे पोलिसांत केली होती.

जुने गोवेचे पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे ३० मे रोजी रात्री ८.१५ च्या सुमारास अज्ञाताने तक्रारदाराला व्हॉट्स ॲपवर फोन केला. त्याने स्वतःची ओळख ‘बँक ऑफ बडोदा’चा कर्मचारी दीपक अग्रवाल अशी केली. या बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना क्रेडिट कार्डवर मोफत शॉपिंग डील देऊ केली आहे.

त्यानंतर तक्रारदाराला व्हॉट्स ॲप व्हिडिओ कॉल आला आणि त्याला त्याचा क्रेडिट कार्डचा सीव्हीव्ही नंबर आणि ओटीपी शेअर करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर तक्रारदाराच्या बँक खात्यामधून ३ लाख १३ हजार रुपयांचा अनधिकृत व्यवहार करण्यात आला.

पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या देखरेखीखाली तक्रारदाराला ज्या मोबाईलवरून फोन आला होता, त्याची माहिती अत्याधुनिक यंत्रणेद्वारे जमा करण्यात आली. त्या माहितीचे तांत्रिक विश्‍लेषण केले.

Crime News
Job Scam: अर्धवेळ नोकरीसाठी दिले 9.5 लाख, मोबाईल ॲपवरून फसवणूक; मुंबईच्या तरुणाला अटक

या चौकशीत कोलकाता (पश्‍चिम बंगाल) येथे राहणारी सुमन घुघू नावाच्या व्‍यक्तीची माहिती समोर आली. त्याने तक्रारदाराचे पैसे क्रेडिट कार्डवरून काढून ते अनेक बँकांमध्ये हस्तांतरित केले होते. ही माहिती घेऊन जुने गोवेचे पोलिस पथक त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी कोलकाता येथे गेले. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने तेथे राहून संशयिताच्या हालचालींवर २ दिवस बारीक लक्ष ठेवले. २७ जून रोजी संशयित सुमन घुघूला अटक करण्यात आली.

Crime News
Invest Goa Scam: 'इन्व्हेस्ट गोवा' कार्यक्रमात मोठा घोटाळा? 45 लाखांचे नुकसान; CAG अहवालाने GIDCला घेरले

जुने गोवे पोलिसांनी कोलकाता पोलिसांच्या मदतीने सुमनची चौकशी केली. मात्र, तो गुन्हा कबूल करत नव्हता. त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे ठोस पुरावे असल्याने त्याला साहाय्यक मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करून तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला. त्याला गोव्यात आणून अटक केली. त्याला पोलिस रिमांडसाठी ३० जून रोजी मेरशी न्यायालयात हजर केले जाणार आहे. गुन्ह्याचे मूळ शोधण्यासाठी, फसवणुकीची रक्कम वसूल करण्यासाठी आणि त्यात सहभागी असलेल्या इतर साथीदारांची ओळख पटविण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com