Maina Curtorim housing project protest Dainik Gomantak
गोवा

Maina Curtorim: मायणा कुडतरीत गृहनिर्माण प्रकल्पाला विरोध! पंचायतीवर दबाव; बांधकाम थांबविण्यासंदर्भात बजावणार नोटीस

Maina Curtorim housing project protest: स्थानिकांच्या विरोधाची दखल घेऊन सरपंच ज्योकीम इस्तेबेरो यांनी सचिवाला हे बांधकाम थांबविण्यासाठी संबंधितांना नोटीस पाठविण्याचा आदेश दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: मायणा कुडतरी पंचायती क्षेत्रात सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या विरोधात स्थानिकांनी सोमवारी निदर्शने केली व सभा घेऊन या प्रकल्पाचे काम बंद करण्याचा दबाव पंचायतीवर आणला.

स्थानिकांच्या विरोधाची दखल घेऊन सरपंच ज्योकीम इस्तेबेरो यांनी सचिवाला हे बांधकाम थांबविण्यासाठी संबंधितांना नोटीस पाठविण्याचा आदेश दिला.

यासंदर्भात सरपंच इस्तेबेरो यांनी सांगितले की, आम्ही बांधकाम बंद करण्याची नोटीस बिल्डरला, पोलिसांना व तक्रारदाराला पाठवणार आहोत. शिवाय उद्या या प्रकल्पाला दिलेले बांधकाम परवाना रद्द करावा, म्हणून पंचायतीतर्फे पत्र गट विकास अधिकारी, पंचायत संचालक, आरोग्य खाते, नगर नियोजन खात्याच्या संचालकांना देणार आहोत, असे सरपंच इस्तेबेरो यांनी सांगितले.

या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे व या प्रकल्पामुळे स्थानिकांना आरोग्य, शेती व पर्यावरणीय धोका संभवतो, असे त्यांना कळवणार आहोत, असे सरपंच इस्तेबेरो यांनी सांगितले.

तळ्यांवर परिणाम : रेबेलो

कॉंग्रेस नेते मोरेन रेबेलो यांनी सांगितले की, आम्ही पंचायतीला स्थानिकांची बैठक घेऊन या बांधकामासंदर्भात त्यांच्या विचार जाणून घेण्याची सूचना केली होती. मायणा कुडतरी पंचायत क्षेत्रातील बांधकाम ६० एफएआरपेक्षा जास्त असू नये, शिवाय हे बांधकाम तळ्याच्या २०० मीटर पेक्षा दूर नाही, हे आम्ही पंचायतीच्या निदर्शनास आणून दिले आहे. यापूर्वी अशा अनेक बेकायदेशीर बांधकामांमुळे या गावातील अनेक तळ्यांवर विपरीत परिणाम झालेले आहेत, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Usgao Leopard Incident: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! उसगावात धावत्या बाईकसमोर आला बिबट्या; अपघातात सत्तरीचे दोन तरुण जखमी

Goa Fraud Case: एक सही, मोठं आमिष अन् 1.25 कोटींचा गंडा! सव्वा दोन वर्षांनंतर 'लेडी डॉन' गजाआड; कोर्टानं सुनावली 7 दिवसांची कोठडी

Trigrahi Yog 2026: बुध, शुक्र आणि गुरुची कमाल! शक्तिशाली त्रिग्रही योगामुळे 7 राशींवर होणार धनाचा वर्षाव; जोडीदारासोबतचे संबंध होणार अधिक मधुर

Goa Accident: बंद ट्रकला दुचाकीची मागून धडक, 20 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; मामाच्या घरुन परतताना काळाचा घाला!

लंडन कोर्टाचा फरार नीरव मोदीला मोठा दणका! 'बँक ऑफ इंडिया'ला 100 कोटी देण्याचे आदेश; न्यायाधीशांनी फेटाळले सगळे बहाणे

SCROLL FOR NEXT