

पणजी: गोवा समग्र शिक्षांतर्गत शिक्षण संचालनालयाच्या विविध विभागांतील ३७ कंत्राटी पदे भरण्यासाठी २२ ते २४ जुलैदरम्यान आल्त पर्वरी येथे वॉक-इन मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
या भरती प्रक्रियेत ब्लॉक रिसोर्स पर्सन, क्लस्टर रिसोर्स पर्सन, तांत्रिक सहाय्यक (एमआयएस), एमआयएस समन्वयक, ब्लॉक अकाउंटंट, डेटा एंट्री ऑपरेटर, मल्टिटास्कर, कंत्राटी शिक्षक तसेच ऑटोमोबाईल, बांधकाम, आयटी/आयटीईएस आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रांतील एनएसक्यूएफ प्रशिक्षक या पदांचा समावेश आहे.
सदर नियुक्त्या ३१ मार्च २०२७ पर्यंत कंत्राटी तत्त्वावर करण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ११ हजार ते २५ हजार इतके एकत्रित मानधन दिले जाणार आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन समग्र शिक्षातर्फे करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.