Reis Magos: रेईश-मागूश ग्रामसभेत राडा! महिला सरपंचांसह शासकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ, धमकी देणाऱ्या संशयितावर गुन्हा दाखल

Reis Magos Gram Sabha case: उपस्थित असलेल्या महिला सरपंच श्रीमती सुश्मिता पेडणेकर, इतर पंच सदस्य आणि कर्तव्यावर असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली.
Reis Magos Gram Sabha case
Reis MagosDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: रेईश-मागूश ग्रामसभेचे कामकाज सुरू असताना महिला सरपंच, पंच सदस्य आणि शासकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत, त्यांच्या अंगावर कथित धावून जात धमकी दिल्याप्रकरणी संशयित सोनू याच्याविरुद्ध साळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला नोटीस बजावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास बेती-वेरे येथील पंचायत कार्यालयाच्या सभागृहात रेईश-मागूश पंचायतीची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा सुरू असताना संशयित सोनू याने शासकीय कामात अडथळा आणण्यास सुरुवात केली.

Reis Magos Gram Sabha case
Calangute Panchayat: उघड्यावर सांडपाणी सोडणाऱ्या हॉटेल्सना मोठा दणका! कळंगुट पंचायतीची तब्बल 66 आस्थापनांवर कडक कारवाई

त्याने तिथे उपस्थित असलेल्या महिला सरपंच श्रीमती सुश्मिता पेडणेकर, इतर पंच सदस्य आणि कर्तव्यावर असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. तर संशयिताने त्यांना धमकावत थेट अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि सुरू असलेली ग्रामसभा शांततेत पार पाडण्यास जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला.

या प्रकरणी रेईश-मागूश पंचायतीच्या वतीने सरपंच सुश्मिता पेडणेकर यांनी साळगाव पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित सोनू याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, साळगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अक्षय फातर्पेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com