Mahesh Amonkar

 

Dainik Gomantak 

गोवा

महेश आमोणकरांची प्रकृती खालावली; कब्रस्थानसाठी आंदोलन सुरुच !

मडगावचे नगरसेवक महेश आमोणकर (Mahesh Amonkar) यांची आज दुसऱ्या दिवशी प्रकृती खालावल्याने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. आज सायंकाळी त्यांचा रक्तदाब अचानक वाढल्याने त्यांना चक्कर आली.

दैनिक गोमन्तक

मडगाव: सोनसोडो येथे होऊ घातलेल्या कब्रस्थानच्या जमिनीचा झोन बदल मागे घेण्यात यावा अशी मागणी करून उपोषणाला बसलेले मडगावचे नगरसेवक महेश आमोणकर (Mahesh Amonkar) यांची आज दुसऱ्या दिवशी प्रकृती खालावल्याने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. आज सायंकाळी त्यांचा रक्तदाब अचानक वाढल्याने त्यांना चक्कर आली.

त्यानंतर तातडीने 108 रुग्णवाहिका बोलाविण्यात आली. त्यांचा रक्तदाब वाढल्याचे लक्षात आल्यावर त्यांना पाण्यातून औषध घेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. मात्र आपण आमरण उपोषणावर असल्याने पाण्याचा थेंबही घेणार नाही असे सांगून त्यांनी औषध घेण्यास नकार दिला.

मडगावात (Margao) मुस्लिम लोकांसाठी कब्रस्थान बांधण्याचे काम मागील कित्येक वर्षे अडवून ठेवल्याने त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. हे कब्रस्थान बांधण्यासाठी सोनसोडो येथे जी जमीन संपादित केली होती. त्या जागेवर अन्य प्रकल्प बांधण्यासाठी झोन बदल करण्याचा प्रस्ताव शहर विकास आराखडा समितीसमोर ठेवण्यात आला आहे. हा झोन बदल रद्द करावा यासाठी आमोणकर यांनी कालपासून उपोषण सुरू केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT