गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी पर्यावरण तज्ज्ञ महेश पाटील

गोवा सरकारच्या किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणावर तज्ज्ञ सदस्य म्हणून काम केलेले गोव्यातील इको टुरिझमचे प्रणेते महेश पाटील यांची गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (Goa Pollution Control Board) अध्यक्षपदी आज नियुक्ती जाहीर केली आहे.
Goa Pollution Control Board

Goa Pollution Control Board

Dainik Gomantak

Published on
Updated on

मडगाव: गोवा सरकारच्या किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणावर तज्ज्ञ सदस्य म्हणून काम केलेले गोव्यातील इको टुरिझमचे प्रणेते महेश पाटील यांची गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (Goa Pollution Control Board) अध्यक्षपदी आज नियुक्ती जाहीर केली आहे. गोवा सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांनी आज हा आदेश जारी केला.

<div class="paragraphs"><p>Goa Pollution Control Board</p></div>
...म्हणून गोवा विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी: जुझे फिलिप डिसोझा

कळंगुटचे पंच शॉन मार्टिन्स, पणजी महापालिकेचे नगरसेवक शुभम चोडणकर, वेळगेच्या पंच उन्नती सहस्त्रबुद्धे, म्हापसाचे नगरसेवक आशीर्वाद खोर्जुवेकर आणि कुडचडेचे नगरसेवक प्रदीप नाईक यांची या मंडळावर अन्य सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती असेल असे या आदेशात म्हटले आहे.

दाबाळ येथे एनव्ही फार्म्स म्हणून इको टुरिझम प्रकल्प सुरू करून पर्यटनाची (Tourism) पर्यावरणाशी कशी सांगड घालता येते हे प्रत्यक्षात दाखवून देणारे पाटील यांनी यापूर्वी सेसा गोवा या विख्यात खनिज कंपनीच्या पर्यावरण विभागाचे संचालक म्हणून काम केले असून भारत सरकारच्या नीती आयोगाच्या एका समितीचेही सदस्य म्हणून त्यांनी योगदान दिले आहे. पार्यावरण कायद्याचे तज्ज्ञ म्हणूनही त्यांची ओळख आहे.

<div class="paragraphs"><p>Goa Pollution Control Board</p></div>
...त्या सर्व बेकायदेशीर गोष्टीसाठी मिलींद नाईक जबाबदार: परशुराम सोनुर्लेकर

उद्योग संचालक, अन्न व औषध अधिकारिणीचे संचालक, जलस्त्रोत खात्याचे मुख्य अभियंता, कारखाने आणि बाष्पक खात्याचे मुख्य निरीक्षक आणि आरोग्य संचालक हे मंडळाचे पदसिद्ध सदस्य असून, सीआयआय अध्यक्ष, गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष, गोवा टुअर्स अँड ट्रॅव्हल्स संघटनेचे अध्यक्ष, साधनसुविधा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हे या मंडळाचे अन्य सदस्य आहेत. तर पर्यावरण खात्याच्या संचालक शर्मिला मोंतेरो या या मंडळाच्या सदस्य सचिव आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com