Babu Ajgaonkar & Mahesh Amonkar

 

Dainik Gomantak 

गोवा

मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने आमोणकरांनी सोडले उपोषण

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी मोबाईलवरुन महेश आमोणकर यांच्याशी संपर्क साधला योग्य तो निर्णय घेण्याचे आश्र्वासन दिले.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: सोनसोडो येथे कब्रस्थानासाठी जी जमिन राखीव ठेवण्यात आली होती, त्या जमिनीचा बदललेला झोन मागे घ्यावा म्हणून उपोषणाला बसलेले नगरसेवक महेश आमोणकर यांनी आज तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar) यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे उपोषण मागे घेतले. आज संध्याकाळी आजगावकर यानी महेश आमोणकर या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्र्वासन दिले. शिवाय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी मोबाईलवरुन महेश आमोणकर यांच्याशी संपर्क साधला योग्य तो निर्णय घेण्याचे आश्र्वासन दिले.

उद्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बैठक बोलावली असुन संबंधीत खात्याच्या अधिकाऱ्यांना तसेच उपोषणकर्ते महेश आमोणकर (Mahesh Amonkar) व मुस्लिम बांधवाच्या प्रतिनिधींना बैठकीला बोलावले असल्याचे महेश आमोणकर यानी सांगितले. गेल्या 40 वर्षांपासुन मडगावात कब्रस्थानचा प्रश्र्न भेडसावत आहे. सद्याचे आमदार दिगंबर कामत याना हा प्रश्र्न सोडविता आलेला नाही. त्यानी मुस्लिम बांधवाचा केवळ मतांसाठी उपयोग केला असा आरोप आजगावकर यानी सांगितले. कब्रस्थानचा प्रश्र्न राजकीय करु नये व तो समोपचाराने सोडविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

2011 साली सोनसोडो येथे कब्रस्थानसाठी 30 हजार चौरस मीटर जागा राखीव ठेवण्यात आली होती. ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु असताना त्या जागेचा झोन बदल कुणी व कशासाठी केला याची चौकशी व्हावी अशी उपमुख्यमंत्री आजगावकर यानी मागणी केली. भारतीय जनता पक्षाला जातीयवादी संबोधने योग्य नव्हे. ब्रस्थानचा प्रश्र्न आपण 100 टक्के सोडविणार असल्याचे आश्र्वासनही त्यानी या वेळी दिले. त्यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते उर्फान मुल्ला उपस्थित होते.

त्यापूर्वी सकाळी प्रसारमध्यमांशी बोलताना लुईझीन फालेरो (Luizinho Faleiro) मुख्यमंत्री असताना मडगावचे आमदार दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी सिने विशांत जवळील एक जागा तिन्ही समाजातील लोकांच्या स्मशानासाठी संपादित करण्याचा ठराव विधानसभेत मांडला होता आणि तो ठराव संमत होऊन ही जागा संपादितही करण्यात आली होती. पण नंतर कामत यांनी ही जमीन बिल्डरांच्या घशात घातली असा आरोप केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT