Mahashivratri celebration in goa Dainik Gomantak
गोवा

Mahashivratri 2026: ओम नमः शिवाय! गोव्यात महाशिवरात्रीची जय्यत तयारी; कुठे, काय असणार कार्यक्रम? पहा..

Mahashivratri 2026 In Goa: मळा - पणजी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त पूर्ण दिवस महाभिषेक होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : राज्यभरात रविवार, १५ रोजी होणाऱ्या महाशिवरात्रीचा उत्साह संचारला असून उत्सवाची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. मळा - पणजी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त पूर्ण दिवस महाभिषेक होणार आहे.

मळा - पणजी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त पूर्ण दिवस महाभिषेक होणार आहे. १४ रोजी सकाळी ९ वा. अभिषेक, आरती व तीर्थप्रसाद, सायं. ६.३० वा. भाऊ नाईक यांच्याद्वारे कीर्तन, रात्री ८.३० वाजता आरती व अल्पोपहार होईल. १५ रोजी दुपारी १२.३० वाजता महाआरती व उपवासाचा प्रसाद, दुपारी २ वाजता सामूहिक अभिषेकाला सुरुवात होईल.

रात्री १२.२८ वाजता महाभिषेक सुरू होईल. १.१८ वाजता आरती व तीर्थप्रसाद होईल. १६ रोजी सकाळी ७ वाजता श्रींचा मंगलाभिषेक, सकाळी ९ वाजता वरदशंकर पूजा, दुपारी १२.३० वाजता महाआरती त्यानंतर महाप्रसादाने सांगता होईल. दरम्यान, हरवळे-साखळी येथील श्री रुद्रेश्वर देवस्थानात शनिवार, १४ रोजीपासूनच महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ होणार असून महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवार, १६ रोजी या तीन दिवसीय भव्य उत्सवाची सांगता होणार आहे.

शनिवारी रात्री पालखी मिरवणूक व नाट्यप्रयोग झाल्यानंतर उत्तररात्री २.३० वा. रुद्रेश्वर देवस्थानचे अध्यक्ष यशवंत माडकर यांच्या हस्ते श्री रुद्रेश्वराच्या लिंगावर पहिला अभिषेक करण्यात येणार असून त्यानंतर मुक्तद्वार स्वहस्ते अभिषेकाला प्रारंभ होणार आहे. दरम्यान, श्री विश्वाटी विश्वेश्वर शिवशंकर देवस्थान काणका (तळ्याजवळ), म्हापसा येथे महाशिवरात्रोत्सवानिमित शनिवार, १४ रोजी सकाळी ९ वा. श्री सत्यनारायण महापूजा, आरती, रात्री ८ वा. ‘स्वर अक्षय’ कार्यक्रमात गायक कलाकार अक्षय नाईक, गौतमी हेदे बांबोळकर, समृद्ध चोडणकर गायन करतील.

रविवार, १५ रोजी महाशिवरात्री उत्सवानिमित्त सकाळी ५ वा. मंदिर शुद्धीकरण, इतर धार्मिक विधी, अभिषेक, सायं. ५.३० वा. ‘शिव स्वरानंद’ कार्यक्रम, रात्री ८.३० वा. पालखी उत्सव, रात्री ११ वा. मान्यवरांच्या हस्ते ‘लॉटरी कूपन ड्रॉ’, रात्री ११.३० वा. आजगावकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ आजगाव यांचा शिवपुराणावर आधारित महान पौराणिक नाट्यप्रयोग ‘यतिनाथ शिव हंस अवतारी’ सादर करण्यात येणार आहे.

दरम्यान, श्री महादेव सातेरी देवस्थान वझरी येथे महाशिवरात्रीनिमित्त १६ रोजी रात्री ९.३० वाजता श्री माऊली कला व संस्कृती मंडळ कुटबनवाडा येथील महिला मंडळातर्फे श्री संत भानुदास यांच्या जीवनावर आधारीत संगीत ‘विठू आले माहेरा’ हा प्रयोग महिला नाट्यकलाकार सादर करणार आहेत. दरम्यान, लोटली येथील श्री रामनाथ मंदिरात १५ रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी ७ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत भक्तांना शिवलिंगावर स्वहस्ते अभिषेक करता येणार आहे. नंतर सायंकाळी ६.३० वाजता लघुरुद्र, आरती, प्रसाद होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Marathi language: हरवलेली अमृताची रसाळ वाणी अन् मराठीची दशा

Goa Fish Market: निविदाच नाही, मग 'सोपो' कर कसा? बोटमालक संघटनेचा सवाल, 'एसजीपीडीए' मार्केटमधील घोळ

Goa Elder Abuse: "वडिलांचा छळ करणाऱ्या मुलगा-सुनेला घरातून बाहेर काढा!" लंडनस्थित मुलीची थेट पोलिसांकडे आक्रमक मागणी

Tuyem Health Centre: तुये आरोग्य केंद्रातील कामे पूर्ण करा; नागरिक कृती समितीतर्फे आरोग्य विभागाला निवेदन

Wari: विठ्ठलनामाचा गजर, पंढरीकडे वारकऱ्यांची वाटचाल; पिळगाव येथून प्रथमच निघाली पायीवारी, महिलांसह एकूण 160 जणांचा सहभाग

SCROLL FOR NEXT