बाल लैंगिक शोषणाचे साहित्य बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक; इन्स्टाग्राम खात्याच्या तपासातून धक्कादायक प्रकार उघड

Child Sexual Abuse Material: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६७ बी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
Child Sexual Abuse Material
Child Sexual Abuse Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

वास्को: इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बाल लैंगिक शोषणाशी संबंधित साहित्य बाळगल्याच्या किंवा प्रसारित केल्याच्या आरोपावरून वेर्णा पोलिसांनी झुआरीनगर येथील उमेश (२५) याला गुरुवारी मध्यरात्री अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६७ बी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. सायबर टिपलाइनवरून मिळालेल्या तक्रारीत इन्स्टाग्राम खात्यावर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित संशयास्पद साहित्य पाहिले जात असल्याची किंवा प्रसारित केले जात असल्याची माहिती होती.

Child Sexual Abuse Material
Goa Politics: प्रत्येक कुटुंबाला दरमहा 15 हजारांचा लाभ! सत्तेत येताच मोफत वीज देण्याचे 'आप'चे आश्वासन

तांत्रिक तपासादरम्यान संबंधित इन्स्टाग्राम खाते वापरणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. तो वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत काम करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता संबंधित ई-मेल आणि इन्स्टाग्राम खाती लॉग-इन असल्याचे आढळले. तांत्रिक पडताळणीनंतर त्याला अटक करण्यात आली. वेर्णा पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. असे साहित्य आढळल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.