Rohan Harmalkar Dainik Gomantak
गोवा

Rohan Harmalkar Arrest: जीवे मारण्याची धमकी व मारहाण प्रकरणानंतर आता दुसऱ्या घटनेत 'मगो'चे नेते हरमलकरांना अटक

Goa Crime News: एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केल्याप्रकरणी २५ नोव्हेंबर रोजी हरमलकरांना अटक करण्यात आली होती.

Pramod Yadav

Rohan Harmalkar Arrest

पर्वरी: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते रोहन हरमलकरांना पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. चेक बाऊन्स प्रकरणात पर्वरी पोलिसांनी शुक्रवारी (०६ डिसेंबर) त्यांना अटक केलीय. यापूर्वी जमिनीच्या प्रकरणात झालेल्या वादात जीवे मारण्याची धकमी देऊन मारहाण केल्याच्या घटनेत हणजूण पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

चेक बाऊन्स प्रकरणात रोहन हरमलकर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. पर्वरी पोलिसांनी हरमलकरला अटक करून न्यायालयात हजर केले. एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केल्याप्रकरणी २५ नोव्हेंबर रोजी हरमलकरांना अटक करण्यात आली होती. एक दिवसातच त्यांना जामीन देखील मिळाला होता. दरम्यान, आठ दिवसांत त्यांना आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आलीय.

जमीन प्रकरणात जीवे मारण्याची धमकी आणि मारहाण

रोहन हरमलकर यांनी दुर्गादास मोरजकर यांच्यासह इतर ८- १० दहा जणांनी मिळून सुरेंद्र भरत सिंह कुमार (वय ५१, रा. हिस्सार, हरियाणा) या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. पीडित व्यक्तीने तक्रार दाखल केल्यानंतर हरमलकर आणि मोरजकरांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, एका दिवसांत हरमलकरांना जामीन मिळाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुलांना सोशल मीडिया निर्बंध गरजेचे, करिअरसाठी 'एआय' शिकण्यास प्राधान्य द्यावे- मंत्री रोहन खंवटे

खरी कुजबुज: ही निवडणूक की दहशतीचा खेळ?

Asian Games 2026: कमलजीत आणि सुरुचीचा 'गोल्ड' निशाणा! नेमबाजीत भारतानं जिंकलं सुवर्णपदक; कोरियाच्या तगड्या आव्हानाला दिलं चोख प्रत्युत्तर

IND vs WI: रोहित-विराट पुन्हा मैदानात! भारत-वेस्ट इंडिज वनडे मालिकेचा थरार कधीपासून? मोबाईल, टीव्हीवर फ्रीमध्ये कुठे पाहता येणार सामने?

Zuari River: झुआरी नदीपात्रातील भराव, अतिक्रमणाचा नकाशा द्या; 'NGT'चे जीसीझेडएमएला निर्देश, 2 आठवड्यांची दिली मुदत

SCROLL FOR NEXT