देशात आगामी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यातमध्ये गोव्याचाही समावेश आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात पक्षांतराचे सत्र वाढले आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसपासून ते तृणमुल कॉंग्रेसपर्यंत स्थानिक राजकीय पक्ष सत्तेत आसणाऱ्या सावंत सरकारला पराजित करण्यासाठी युतीची मोट बांधत आहेत. यातच आता पेडणेमधील महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मगोमधील नेत्यांची धगधग समोर येऊ लागली आहे. प्रविण आर्लेकर रविवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे देखील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
पेडणे मतदार संघाचे मगोचे उमेदवार प्रवीण आर्लेकर (Praveen Arlekar) यांनी मतदार संघातून उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Azgawkar) यांच्या विरोधात जबरदस्त वातावरण तयार केले होते, मगोचा आमदार देण्याची क्षमता आर्लेकर यांनी तयार केली होती, आपण कधीच मगो पक्षाचा विश्वास घात करणार नाही असे स्थानिक पत्रकाराना आणि कार्यकर्त्याना सांगत होते, मागच्या आठवड्यात मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्या उपस्थितीत पेडणे येथे पत्रकार परीशध घेवून आपण कधीच मगो पक्ष सोडणार नाही, विरोधक आपल्याविषयी अफवा पसरवतात असे ते सांगत होते, आठ दिवस न होताच त्यांनी मगोचा त्याग केला. आणि कोण विश्वासघातकी हे दाखवून दिले.
मगोचे उमेदवार प्रवीण आर्लेकर यांनी मगो पक्ष सोडल्यानंतर मगोच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. मागच्या दोन वर्षापासून प्रवीण आर्लेकर यांनी पेडणे मतदार संघात काम सुरु केले आपल्या खीशातील किमान आता पर्यंत अडीच कोटी खर्च करून मगोसाठी पूरक असे वातावरण तयार केले होते, सरकारच्या विरोधात आणि उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याविषयी नाराज होवून अनेक कार्यकर्त्यांनी मगोला साथ दिली होती, आता प्रवीण आर्लेकर हे भाजपात गेले त्याना मगो आणि भाजपाची कशी साथ मिळते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
उमेदवारीसाठी पक्ष त्याग
या मतदार संघातून भाजपचा उमेदवार डेंजर झोन मध्ये होता असा अहवाल पक्ष्श्रेस्ठींकडे पोचला आणि मगोच्या उमेदवारालाच गळ घालून त्याला उचलण्याचा प्रयत्न मागच्या तीन महिन्यापासून सुरु होता. भाजपाच्या उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांची रस्सीखेच चालू होती, भाजपने सध्यातरी या दोन्ही उमेदवाराना बाजूला ठेवून मगोच्या उमेदवाराला प्रवेश देवून भाजपची उमेदवारी देण्यासाठी हमी दिलेली आहे. प्रवीण आर्लेकर यांच्या बंडखोरीमुळे पुन्हा एकदा पेडणे मतदार संघातून राजकीय समीकरणाना वेग मिळणार आहे.
आता मगोसाठी उमेदवार कोण बाबू कि राजन ?
प्रवीण आर्लेकर यांनी मगोचा त्याग केला तर आता मगोसाठी उमेदवार कोण या कडे लक्ष लागून आहेत. जो पर्यंत सुधीन ढवळीकर मगोत आहे तो पर्यंत उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर याना मगोत प्रवेश मिळणे कठीण असले तरी मगोची आणि तृणमूलची युती झाल्याने तृणमूलचे नेते उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर याना पक्षात घेवून दोन फुलांच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास गळ घालत आहे. तर दुसऱ्या बाजूने मिशन फॉर लोकलचे राजन कोगावकर याना मगो पक्षात घेवून उमेदवारी देण्यासाठी जोरदार प्रयत्न आहेत.
या विषयी मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांच्याकडे संपर्क साधला असता आपणास अनेक पक्षाच्या ऑफरी आहे. परंतु आपण अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. आपण सध्यातरी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहे, इतर पक्षात जायचं कि नाही तो निर्णय आपले समर्थक आणि स्वाभिमानी पेडणेकर घेतील असे कोरगावकर म्हणाले.
मगोचाच विजय: उमेश तळवणेकर
मगोचे प्रवक्ते उमेश तळवणेकर यांनी बोलताना मगो पक्ष या मातीतला आहे, याही पुढे मगो पक्षाचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास व्यक्त करून जे कोणी पक्ष सोडून गेले त्यांची काय गत झाली हा इतिहास समोर आहे, भाजपा सत्येवर येवून नये यासाठी मगोने पेडणे मतदार संघातून सुरुवात केली. भाजपा विरोधी जबरदस्त वातावरण तयार केले आणि अचानक प्रवीण आर्लेकर यांनी जो पक्ष सोडून गेला त्यातून त्याना त्यांची जागा पेडणेकर दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, मागच्या निवडणुकीत मगोच्या कार्यकर्त्यांनी मगोचा आमदार जसा निवडून आणला तीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा २०२२ च्या निवडणुकीत होईल असा विश्वास व्यक्त केला.
माजी सरपंच देवेंद्र देसाई यांनी प्रतिक्रिया देताना भाजपला राजकीय लुटारू पक्ष म्हणून ओळखले जाते,आदी त्यांनी इतर पक्षाच्या आमदाराना लुटले आणि आता उमेद्वारावारा पळवत आहे. केडरवर आधारित पक्ष असल्याची गर्जना करणारे आता केडर का पाळत नाही असा सवाल करून आता स्वाभिमानी पेडणेकरांची हि सत्व परीक्षा आहे असे ते म्हणाले.
प्रवीण आर्लेकर यांनी मगो पक्षाच्या त्याग केल्यानंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आता मतदानाद्वारे त्याना उत्तर देणे योग्य असल्याचे नागरिक म्हणतात. प्रवीण आर्लेकर यांनी मगो पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. सुरुवातीपासून मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर आणि प्रवीण आर्लेकर यांनी बाबू विरोधी जबरदस्त वातावरण निर्माण केले होते. आणि आता भाजपच्या कळपात आर्लेकर गेल्याने दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होवून नवा इतिहास रचण्यानासाठी स्वाभिमानी पेडणेकर सज्ज्य आहेत.
तरीही जुने भाजपा कार्यकर्त्ये अधांतरी
बाबू आजगावकर नको म्हणून भाजपचे जुने जेष्ठ कार्यकर्त्ये बाबू पासून दूर गेले होते, त्याना यंदा स्थानिक उमेदवार हवा आहे, म्हणून त्यांनी राजन कोरगावकर यांची साथ दिलेली आहे. आता आर्लेकर भाजपात गेल्याने हे कार्यकर्त्य काय करतात याकडे लक्ष लागून आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.