फातोर्डा-फोंडा रस्ता अडविल्याबद्दल विजय सरदेसाई आणि इतर 100 जणांवर एफआयआर

फातोर्डा पोलिसांची एफआयआर नोंदवला.
Vijay Sardesai and police 

Vijay Sardesai and police 

Dainik Gomantak 

मडगाव: राज्य हमरस्ता अडविणे, बेकायदा जमाव बनविणे, सरकारी नोकरांना कायदेशीर कारवाई करण्यापासून रोखणे अशा विविध गुन्ह्याखाली आज फातोर्डा पोलिसांनी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) आणि गोवा फॉरवर्डच्या (Goa Forward) सुमारे 100 कार्यकर्त्यावर गुन्हा नोंद केला आहे.

<div class="paragraphs"><p>Vijay Sardesai and police&nbsp;</p></div>
कोरोनाचे निर्बंध कागदावरच; किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी

भारतीय दंड संहितेच्या 143 (बेकायदा जमाव जमविणे), 341 (अडवणूक करणे), 353 (सरकारी नोकरांच्या कामात व्यत्यय आणणे) यासह 149 (दंगल करण्याच्या इराद्याने जमाव जमविणे) या कलमाखाली गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली.

काल फातोर्ड्यातील (Fatorda) विकासकामे बंद केल्याच्या निषेधार्थ विजय सरदेसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोर्चा काढून रस्ता अडविला होता. रस्ता मोकळा करण्यासाठी पोलीस आले असता मोर्चेकऱ्यांनी त्यांच्याही हुज्जत घातली होती. यामुळे सुमारे 1 तास राज्य हमरस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती आणि लोकांना त्रास झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com