NDA Mega Meet Google Image
गोवा

NDA Mega Meet: दिल्लीतील 'रालोआ'च्या बैठकीला 'मगोप'चीही उपस्थिती

38 पक्षांच्या नेत्यांची हजेरी

Akshay Nirmale

MGP Participated In NDA Mega Meet: भाजपच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स - एनडीए) बैठक आज, मंगळवारी नवी दिल्लीत पार पडली. भाजपच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत एनडीएमध्ये सहभागी असलेल्या 38 पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. यामध्ये गोव्यातील भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचाही (मगोप) समावेश होता.

'मगोप'चे अध्यक्ष दीपक ढवळीकर या बैठकीत सहभागी झाले होते. मगोप पक्ष गोव्यातील सत्तेत भाजपसोबत सहभागी आहे. मगोप चे दोन आमदार सुदीन ढवळीकर आणि जीत आरोलकर गोवा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते.

या दोन्ही आमदारांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे. मगोप चे आमदार सुदीन ढवळीकर हे गोव्याचे वीज मंत्री आहेत.

आजच, बंगळूर येथे भाजपच्या विरोधकांची बैठक झाली होती. यात एकूण 26 पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी, उद्धव बाळासाहेब ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे नेते नितीशकुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल, राजदचे नेते लालू प्रसाद यादव आदी उपस्थित होते.

विरोधकांच्या या बैठकीच्या पार्श्वभूमीवर झालेली एनडीएची ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, एडीएच्या बैठकीत मोदींनी बंगळूरमध्ये झालेल्या विरोधकांच्या बैठकीवरही टीका केली.

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत त्यांनी आढावा घेतला. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. देशाच्या आगामी 25 वर्षांच्या विकासाचे प्लॅनिंग केल्याचे सांगत त्यांनी पुढील लोकसभा निवडणुकीतही एडीएचेच सरकार सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला.

या बैठकीवेळी भाजपच्या मित्र पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दिल्लीतील द अशोक हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: आरोग्यमंत्री राणेंनी घेतली फडणवीसांची भेट; विजयाबद्दल केले अभिनंदन

Ranbir Kapoor at IFFI 2024: आलियाने विचारलं" किशोर कुमार कोण आहे?" रणबीरने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा; Video Viral, चाहते नाराज

Corgao: सरपंच निवड हा पंचायतीचा विषय! कोरगाववासीय नाईक यांच्या पाठीशी; धार्मिक वादाला विरोध

Her Story Her Screen महिला सबलीकरणाला समर्पित! IFFI चे सकारात्मक पाऊल

Saint Francis Xavier Exposition: शब्द नाही भाव महत्वाचा, सेंट झेवियर यांनी ऐकली हावभावांची प्रार्थना; गोव्यात पहिल्यांदाच माससाठी सांकेतिक भाषेचा वापर

SCROLL FOR NEXT