Omkar elephant Goa Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: 'आता गोवाच मदत करू शकतो', ओंकारची महाराष्ट्रात फरपट; सिंधुदुर्गातील नागरिकांचे मंत्री राणेंना आवाहन

Omkar elephant news: या हत्तीला महाराष्ट्रातील राज्य सरकारने न्याय मिळवून देण्यात आणि त्याचे सुरक्षित पुनर्वसन करण्यात अपयश आले

Akshata Chhatre

Goa Forest Minister Vishwajit Rane: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र-गोवा सीमेवरील गावांमध्ये 'ओंकार' नावाच्या एका हत्तीच्या स्थलांतरावरून आणि त्याच्या सुरक्षेवरून मोठा वाद निर्माण होतोय. दोन्ही राज्यांत धुमाकूळ घालणाऱ्या या हत्तीला महाराष्ट्रातील राज्य सरकारने न्याय मिळवून देण्यात आणि त्याचे सुरक्षित पुनर्वसन करण्यात अपयश आले, अशी टीका आता महाराष्ट्रातील नागरिकांनीच सुरू केली आहे.

गोव्याच्या वनमंत्र्यांकडून मोठी अपेक्षा

नागरिकांच्या मते, महाराष्ट्रातील यंत्रणा हत्तीला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी निर्णायक पाऊल उचलू शकल्या नाहीत, ज्यामुळे ओंकारला योग्य न्याय मिळाला नाही.

महाराष्ट्रातील जनतेचा आता असा विश्वास आहे की, फक्त गोवा राज्याचे वनमंत्री विश्वजित राणे हेच ओंकारला योग्य न्याय मिळवून देऊ शकतात. ओंकार हा हत्ती न्यायाच्या शोधातच गोव्यात आला आहे, अशी भावना सीमाभागातील नागरिक व्यक्त करत आहेत.

राज्यातील नागरिकांनी गोवा सरकारला आणि विशेषतः मंत्री राणे यांना आवाहन केले आहे की, त्यांनी या हत्तीच्या सुरक्षिततेसाठी आणि योग्य पुनर्वसनासाठी तातडीने पाऊले उचलावीत.

'योग्य निर्णय घेऊन संरक्षण द्या'

महाराष्ट्रातील नागरिकांनी गोव्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या आहेत. मंत्री विश्वजित राणे यांच्यावर विश्वास व्यक्त करताना नागरिक म्हणाले की, तेच या प्रकरणात योग्य निर्णय घेऊन 'ओंकार'ला आवश्यक संरक्षण आणि नैसर्गिक अधिवास मिळवून देतील.

वास्तविक पाहता, 'ओंकार हत्ती गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र (सिंधुदुर्ग) आणि गोवा (पेडणे) सीमेवरील गावांमध्ये शेतीचे नुकसान करत आहे, ज्यामुळे त्याला पकडून कर्नाटकच्या हत्ती कॅम्पमध्ये पाठवण्याची चर्चा महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या वनविभागांमध्ये सुरू होती.

मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणात हस्तक्षेप करत ओंकारला तात्पुरते गुजरातच्या 'वंतारा' प्राणी संगोपन केंद्रात स्थलांतरित करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर, आता गोवा सरकार आणि मंत्री विश्वजित राणे कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT