Bicholim Goa Shigmotsav 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav 2023: डिचोली चित्ररथ स्पर्धेत बांदोड्याची महालक्ष्मी नागरिक समिती प्रथम

शिगमोत्सव स्पर्धा : रोमटामेळमध्ये खांडेपार समिती पथक अव्वल

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Goa Shigmotsav 2023: डिचोली शिगमोत्सव समिती आयोजित चित्ररथ स्पर्धेत बांदोड्याच्या महालक्ष्मी नागरिक समितीच्या चित्ररथाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.

रोमटामेळ स्पर्धेत खांडेपार शिगमोत्सव समिती पथकाने तर लोकनृत्य स्पर्धेत केळबाई-कुर्टी येथील सरस्वती कला मंडळ पथकाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.

रविवारी (ता.12) डिचोली शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि दिलीप धारगळकर यांनी पर्यटन खाते आणि पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने शिगमोत्सवानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर केला.

शिगमोत्सव समितीचे कार्याध्यक्ष कुंदन फळारी, खजिनदार रामा परब, कार्यक्रम प्रमुख शंकर बेतकीकर, नारायण बेतकीकर, डॉ. कौस्तुभ पाटणेकर, रुद्रेश चणेकर, रोहिदास पळ, सुजाता मांद्रेकर, जयेंद्रनाथ गोवेकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

विविध स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे...

चित्ररथ स्पर्धा : द्वितीय-त्रिवेणी कला संघ (दुर्भाट), तृतीय-दाड साखळ क्लब (माशेल), चौथे-गजानन क्रिएटिव्ह बॉयज (फोंडा), पाचवे-बालगोपाळ (चिंबल), उत्तेजनार्थ-मेरशी सांस्कृतिक ट्रस्ट, दामोदर प्रसन्न विठ्ठल रखुमाई, श्री साई रवळनाथ बाल मंडळ, रायेश्वर युवक मंडळ आणि दामोदर महालक्ष्मी कला संघ.

रोमटामेळ स्पर्धा : द्वितीय- कुडचडे-काकोडा शिगमोत्सव समिती, तृतीय-सुयोग शिगमोत्सव समिती, चौथे-पाईकदेव शिगमोत्सव समिती, पाचवे-सावर्डे शिगमोत्सव समिती, उत्तेजनार्थ-डोंगरी शिगमोत्सव समिती आणि शांतादुर्गा शिगमोत्सव मंडळ.

वेशभूषा स्पर्धा : (लहान गट)- प्रथम-तनुश्री वाडीकर, द्वितीय-लक्ष नाईक, तृतीय-अनन्या माठकर, उत्तेजनार्थ-रुद्र परब, याशिका नाईक, विहान पुजारी आणि सव्या आमोणकर.

लोकनृत्य स्पर्धा : -द्वितीय-विजया कला संघ (कुर्टी-फोंडा), तृतीय-श्री नवदुर्गा कला सांस्कृतिक मंडळ (मडकई-फोंडा), चौथे-लाखेरे सांस्कृतिक कला मंडळ, पाचवे-सिद्धिविनायक म्हाळसा कला संघ (आकार-म्हार्दोळ) आणि उत्तेजनार्थ- महालक्ष्मी सेल्फ हेल्प ग्रुप (उसप).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT