Mahadayi Water Dispute
Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute:...यामुळे ‘म्हादई बचाव’ सभेला दिलेली परवानगी मागे

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: साखळीत ‘म्हादई बचाव’ बॅनरखाली राज्यभरातील आंदोलकांनी सभेची जय्यत तयारी सुरू केली असतानाच, गुरुवारी एकाएकी या सभेला दिलेली परवानगी साखळी पालिकेने मागे घेतली.

यामुळे सरकार धास्तावले असून आंदोलक निष्प्रभ न होता आणखीनच आक्रमक झाले आहेत. ही सभा कोणत्याही परिस्थितीत होणारच, असा वज्रनिर्धार आंदोलकांनी केला आहे. विशेष म्हणजे, पालिकेने हा निर्णय घेताना पालिका मंडळाला विश्‍वासात घेतलेले नाही, असे नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी सांगितल्याने या विषयाने वेगळेच वळण घेतले आहे.

‘म्हादई बचाव’ सभेला देण्यात आलेली परवानगी मागे घेतल्याने राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. तसा आदेशही साखळीचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी जारी केला आहे. त्यामुळे ''म्हादई''च्या अस्तित्वासाठी पुढे सरसावलेल्या म्हादईप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

यामागे राजकीय हस्तक्षेप झाला असल्याचा आरोपही होऊ लागला आहे. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी अत्यंत घाईगडबडीत आणि पालिका मंडळाला विश्वासात न घेतापरवानगी मागे घेण्यासंबंधी आदेश काढला असल्याचे नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी म्हटले आहे.

कर्नाटकच्या कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या सुधारित अहवालास केंद्रीय जलशक्ती आयोगाने मान्यता दिल्यानंतर गोव्यात वातावरण तापले आहे. म्हादईच्या अस्तित्वासाठी राज्यभर जनजागृतीही होत असून, व्यापक लढ्याची तयारीही सुरू केली आहे.

त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.16) साखळी येथे ''म्हादई बचाव'' बॅनरखाली सभा आयोजित करण्याचा निर्धार आंदोलकांनी केला होता. या सभेला राज्यभरातून मिळून हजारो म्हादईप्रेमी उपस्थित राहाणार होते. मात्र, आता या सभेला दिलेली परवानगीच मागे घेतल्याने सभेत विघ्न आले आहे.

आदेश घाईगडबडीत : नगराध्यक्ष

''म्हादई बचाव'' सभेला परवानगी देण्याचा निर्णय पालिका मंडळाने घेतला होता. मात्र, मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी घाईगडबडीत परवानगी मागे घेतली आहे.

परवानगी मागे घेताना पालिका मंडळाला विश्वासात घेतलेले नाही, अशी प्रतिक्रिया साखळीचे नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी व्यक्त केली. व्यापारी संघटनेचे पत्र येताच तातडीने परवानगी मागे घेण्याचा आदेश काढला, असेही त्यांनी म्हटले आहे.

या कारणास्तव साखळीच्या मुख्याधिकाऱ्यांनी घेतली परवानगी मागे

साखळीतील सभेला सशर्त परवानगी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. सोमवारी (ता. ९) पालिकेने परवानगी देणारे पत्रही जारी केले होते. मात्र, काल मुख्याधिकारी शिरगावकर यांनी सभेला दिलेली परवानगी मागे घेत असल्याचा आदेश जारी केला.

सोमवार हा साखळीच्या आठवडी बाजाराचा दिवस. या दिवशी सभा घेतल्यास वाहतूक कोंडी होण्याची शक्यता गृहीत धरली आहे. साखळी व्यापारी संघटनेने आजच (ता.12) पालिकेला तसे पत्रही दिले आहे. त्या पत्राला अनुसरून परवानगी मागे घेत असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Loksabha Voting: 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या घरबसल्या मतदानाला गोव्यात सुरुवात

Goa Today's Live News Update: मांद्रे आश्वे येथील दल्लास हॉटेल सील

Bomb Threat At Dabolim Airport: दाबोळीवर बॉम्ब असल्याची धमकी, यंत्रणा सतर्क; सुरक्षेत वाढ

Theft In Bodgeshwar Temple: बोडगेश्वर मंदिरात पुन्हा मोठी चोरी; फंडपेटी फोडून 12 लाखांची रोकड लंपास

Taleigao Election Result: ताळगावमधून युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ, मंत्री बाबूश यांचे पॅनल विजयी

SCROLL FOR NEXT