Mahadayi Water Issue In wardha sahitya sammelan Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Issue : 'म्हादई'संदर्भात वर्धा मराठी साहित्य संमेलनात ठराव संमत

वर्धा येथे भरलेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काल रविवार 5 रोजी समारोपाच्या सत्रात गोव्याची जीवनदायीनी म्हादई संदर्भात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष तथा गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी ठराव मांडला.

दैनिक गोमन्तक

वर्धा : वर्धा येथे भरलेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काल रविवार 5 रोजी समारोपाच्या सत्रात गोव्याची जीवनदायीनी म्हादई संदर्भात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष तथा गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी ठराव मांडला. (Mahadayi Water Issue In wardha sahitya sammelan)

गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष श्री राजमोहन शेटये यांनी त्याला अनुमोदन दिले. या ठरावात गोव्याची जीवनदायीनी म्हादई नदी कर्नाटक राज्यातून उगम पावून महाराष्ट्र आणि गोव्यातून प्रवाहित होते. नैसर्गिकरीत्या गोवा आणि महाराष्ट्र या पाण्याच्या पात्रावर विसंबून आहेत. तरीही कर्नाटक राज्य या नदीच्या प्रवाहाला परिवर्तित करून महाराष्ट्रा - गोवा राज्याच्या नैसर्गिक हक्कावर गदा आणत आहे.

जीवनदायीनी ही 70% गोव्यातून 24% कर्नाटकातून आणि 6 % महाराष्ट्रातून वाहते. कळसा भांडुरा प्रकल्पाच्या नावाने जीवनदायीनी महादईचे पाणी वळवल्यास सामाजिक, सांस्कृतिक आणि जैवीकसंपदेवर मोठा परिणाम दिसून येईल. गोव्यावर पाण्याचे संकट उभे राहील आणि पर्यावरण प्रिय असलेल्या या राज्यात जल संकटामुळे इथले जनजीवन विस्कळीत होईल.

महादइचे पाणी न वळविण्याचा विचार या साहित्य मंचावरून व्हावा. तसेच कर्नाटक सरकारने सादर केलेल्या DPR ला दिलेली मान्यता रद्द करून गोवा आणि महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारला विनंती करावी. या ठरावाचे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले.

तत्पूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत प्रा. उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्वला मेहंदळे, कोषाध्यक्ष श्री प्रकाश पागे यांच्याकडे गो. सा. से मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, कोषाध्यक्ष राजमोहन शेटये यांनी या ठरावाची प्रत सुपूर्द केली होती. महामंडळाच्या बैठकीत तो ठराव अगोदर संमत केला होता. महामंडळाच्या सर्व सदस्यांनी त्यास अनुमोदन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT