Mahadayi Water Dispute | Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: म्‍हादईचे पाणी वळविण्‍यामागे मोठे षडयंत्र; करणार पर्दाफाश

पाणी वळविण्‍यामागे मोठे षडयंत्र असून या सभेत त्‍याचा पर्दाफाश करण्‍यात येईल, असा इशारा रिव्हॉल्‍युशनरी गोवन्सचे (आरजी) प्रमुख मनोज परब यांनी पत्रकार परिषदेत दिला.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: म्‍हादई नदी वाचविण्‍यासाठी समस्‍त गोमंतकीयांनी राजकीय मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे. त्‍यासाठी येत्या रविवार दि. 22 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 पणजीतील आझाद मैदानावर जनजागृती सभेचे आयोजन करण्ण्‍यात आले आहे.

पाणी वळविण्‍यामागे मोठे षडयंत्र असून या सभेत त्‍याचा पर्दाफाश करण्‍यात येईल, असा इशारा रिव्हॉल्‍युशनरी गोवन्सचे (आरजी) प्रमुख मनोज परब यांनी पत्रकार परिषदेत दिला.

म्‍हादई नदीचे पाणी वळविण्‍यास राष्ट्रीय स्तरावरील सर्व पक्ष कारणीभूत आहेत. या पक्षांचे लक्ष आता कर्नाटकात होणाऱ्या निवडणुकांवर आहे. आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी हे पक्ष तेथे म्हादईचा नावाचा वापर करीत आहेत. इकडे गोव्‍यातील जनतेच्‍या भावना पायदळी तुडविण्‍यात आल्‍या आहेत, असे परब म्‍हणाले.

‘आरजी’ हा फक्त एकमेव असा स्थानिक पक्ष आहे, जो कुठल्याच राजकीय स्वार्थासाठी काम करत नाही तर गोव्याच्या आणि गोवेकरांच्या अस्तित्वासाठी लढा देत आहे. म्हादई नदीचा प्रश्न अतिशय गंभीर असून पुढे त्याचे परिणाम प्रत्येक गोवेकराला भोगावे लागणार आहेत.

तसे होऊ नये म्‍हणून ‘आरजी’चे कार्यकर्ते प्रत्येक गावागावांत, घराघरांत जाऊन लोकांना म्‍हादई नदीचे महत्त्‍व पटवून देतील. तसेच या लढ्याचे रुपांतर आम्ही जनआंदोलनात करून स्वार्थी आणि हुकूमशाही सरकारविरोधात रस्‍त्‍यावर येऊ, असेही परब म्‍हणाले.

परवा रविवारी होणाऱ्या आझाद मैदानावरील जनजागृती सभेत म्हादई नदीचा विषय, तिचे गोव्यासाठी असलेले महत्त्‍व, राष्ट्रीय स्तरावरील पक्षांनी मिळून म्हादई नदीला कशा प्रकारे कर्नाटकच्या स्वाधीन केले आणि त्‍यासाठी मागच्‍या अनेक वर्षांपासून सुरू असलेले नियोजित षडयंत्र या सर्व गोष्टींचा खुलासा करण्‍यात येईल. - मनोज परब, ‘आरजी’चे प्रमुख

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Third District: गोव्यात तिसरा जिल्हा झाल्यावर 'सरकारी कामे' वेळेत होणार का? की नोकऱ्यांत ओळखीची लोकं घुसणार..

Government Job: लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडी आणि गोंधळ! 100 पदांसाठी हजारोंची गर्दी, तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत

Goa: गोव्याच्या विद्यार्थिनीचा आवाज घुमला राजस्थानात! 'वनिष्ठा'चे युवा संसदेत प्रतिनिधित्व; दहशतवादावर मांडले परखड विचार

Ganesh Idol: स्वतः 'गणेशमूर्ती' तयार करण्याचा आनंद वेगळाच! शिल्पकलेची कार्यशाळा

Goa Assmbly Live: साकवाळचे सचिव ऑरविले व्हॅलेस यांना निलंबित, डीओपीने त्यांच्यावर कारवाई केली नाही

SCROLL FOR NEXT