Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: आता लोकांनी पेटून उठण्याची वेळ आली

म्हादई वळविल्यास पाण्याचे मोठे संकट येईल. यासाठी येणारी पिढी आम्हाला कधीच क्षमा करणार नाही. त्यामुळे लोकांनी पेटून उठावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी केले.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: म्हादई आमची आई असल्याचे विधान सरकारने केले होते. परंतु सरकारकडून या आईची विक्री करण्‍यात आली आहे. म्हादईचे पाणी वळविण्यास गोवा सरकारने सहकार्य केल्याचे खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

म्हादई वळविल्यास राज्यावर पाण्याचे मोठे संकट येईल. यासाठी येणारी पिढी आम्हाला कधीच क्षमा करणार नाही. त्यामुळे आता लोकांनी पेटून उठण्याची वेळ आली आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी केले.

पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत डिसोझा बोलत होते. यावेळी पक्षाचे नेते अविनाश भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते. डिसोझा म्‍हणाले की, कर्नाटकात विधानसभा निवडणूक होणार असून म्हादईचा वापर राजकारणासाठी करणे हे मुळात चुकीचे आहे.

लोकांनी निवडून दिल्यानंतर आमदार आणि नंतर ते मंत्री झाले आहेत. परंतु आज याच मंडळींनी लोकांना रस्त्यावर आणले आहे. म्हादईचे पाणी वळविल्यास भविष्यात परिस्थिती गंभीर होईल. त्यासाठी आताच प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे, असे डिसोझा म्हणाले.

मुख्‍यमंत्री सावंत खोटे बोलले : क्लाईड क्रास्टो

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हादईप्रश्‍‍नी खोटे बोलले आहेत. त्‍यामुळे त्‍यांनी गोव्‍यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्‍हादईच्‍या सौद्याची कबुलीच दिली आहे.

मात्र गोवा सरकारने या प्रकरणी कोणताही थेट सहभाग नाकारला आहे आणि त्यांनी गोवा विधानसभेत एक ठराव देखील मंजूर केला आहे,

ज्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक सरकारी शिष्टमंडळ घेऊन शहा यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. तसेच म्हादईचे पाणी वळविण्यास कर्नाटकला दिलेली मंजुरी केंद्राला मागे घेण्यास सांगितले.

कर्नाटकची दादागिरी

पणजीत तीन दिवस पाणीपुरवठा नसल्याने शहर कोरडे पडले होते. परंतु म्हादई नदीचे पाणी वळविल्यास त्‍याचे गंभीर परिणाम राज्यातील पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे.

तर, दुसरीकडे कर्नाटकचे शेजारील राज्यांसोबत चांगले संबंध नाहीत. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू या राज्‍यांसोबत त्यांचे वैर आहे. त्यामुळे म्हादईच्या लढ्यात लोकांची भूमिका निर्णायक असेल, असे अविनाश भोसले म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT